News & View

ताज्या घडामोडी

खासदारांची संख्या वाढणार !नव्या संसद भवनाची ही आहेत वैशिष्ट्ये !!

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वा विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त उदघाटन होणाऱ्या नव्या संसद भवनात तब्बल1400 खासदार बसू शकतील एवढी आसनक्षमता तयार केली आहे.त्यामुळे लवकरच लोकसभा सदस्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संसदेच्या या नव्या इमारतीला 4 मजले, 6 प्रवेशद्वार असतील.लोकसभेचे 1 हजार, तर राज्यसभेचे साधारण 400 खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था.सध्या खासदारांना प्रत्येकाच्या आसनासमोर टेबल नाहीत, नव्या संसदेत प्रत्येकासमोर छोटे बाक.या बाकांमध्ये हजेरी नोंदवण्यासाठी, मतदान करण्यासाठी, भाषातंर ऐकण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था असेल.याशिवाय 120 कार्यालयं, म्युझियम, गॅलरीही या इमारतीत असणार आहे.

नव्या संसद भवनात अशा अनेक सुरक्षा व्यवस्था असणार आहेत. ज्यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या संसद भवनामध्ये त्या प्रकारच्या सुरक्षा व्यवस्थाच नाहीत. नवीन संसदेत 360-डिग्री सीसीटीव्हीकडून पाळत ठेवण्याची सुविधा करण्यात आली आहे. त्याचे विशेष हे आहे की, हे सीसीटीव्ही कॅमेरे कोणत्याही व्यक्तीचा चेहरा ओळखण्याची त्यामध्ये यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.त्यामुळे कोणत्याही संशयित व्यक्तीला संसदेत सहजासहजी प्रवेश करणे कठीण होणार आहे.

नव्या संसदेत दहशतवादी आणि संशयितांना रोखण्यासाठी ठोस व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये थर्मल इमेजिंग सिस्टीम ही कोणत्याही घुसखोरांचा शोध घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. याशिवाय कोणत्याही अनुचित घटनेला सामोरे जाण्यासाठी भक्कम फायर अलार्म यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. आगीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अग्निशमन यंत्रणाही पुरविण्यात आली आहे.दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट आणि आग यांसह विविध धोक्यांपासून संसद भवनाचे संरक्षण केले गेले आहे.

या अशा आधुनिक पद्धतीने नवीन संसदेची सुरक्षा व्यवस्था तयार करण्यात आली आहे. या नवीन सुरक्षा उपायांमुळे खासदार, कर्मचारी आणि अभ्यागतांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मदत होणार आहे.

नवीन संसद भवनात भौतिक सुरक्षेशिवाय अनेक सुरक्षा प्रोटोकॉलही असणार आहेत. या प्रोटोकॉलमध्ये प्रवेश नियंत्रणापासून अद्यायवत व्यवस्थापनापर्यंत सर्वकाही समाविष्ट करण्यात आले आहे. संसदेत सुरक्षित वातावरण निर्माण करणे हा प्रोटोकॉलचा उद्देश असला तरी या संसदेमध्ये कोणत्याही हल्ल्याला न घाबरता त्यांचे कर्तव्य लोकप्रतिनिधी पार पाडू शकणार आहेत.

लोकसभेत सकाळी 8.30 ते 09 या वेळेत लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ सेंगोल म्हणजे राजदंड लावला जाईल. तामिळनाडूतील मठाचे 20 साधू-संत या वैदिक विधीमध्ये सहभागी होतील.सकाळी 09 ते 9:30 या वेळेत सर्वधर्मीय प्रार्थना सभा होईल. यामध्ये शंकराचार्यांसह अनेक महान विद्वान, पंडित, संत उपस्थित राहणार आहेत. यामध्ये सर्व धर्माचे गुरु सहभागी होणार आहेत.

दुसऱ्या टप्प्याची सुरुवात दुपारी 12 वाजता राष्ट्रगीताने होईल. यासोबतच दोन लघुपटांचे प्रदर्शनही होणार आहे. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश हे देशाच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या संदेशाचे वाचन करतील. लोकसभा अध्यक्षही यावेळी संबोधन करणार आहेत. या ऐतिहासिक प्रसंगी नाणे आणि टपाल तिकीट काढण्यात येणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. दुपारी अडीच वाजता या कार्यक्रमाची सांगता होईल.

नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर देशातील प्रमुख 19 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. मात्र विरोधकांच्या बहिष्कार कार्यक्रमाला अनेक पक्षांनी विरोध दर्शवला आहे. आंध्र प्रदेशचे सत्ताधारी वायएसआरसीपीचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी हे नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहे, तर बहुजन समाज पक्ष (बीएसपी) अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी सांगितले की नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकणे चुकीचं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *