News & View

ताज्या घडामोडी

मंत्री बँकेने नाट्यगृह केले सील !कर्जाचा छदाम ही न भरल्याने कारवाई !!


बीडतब्बल दहा वर्षांपासून बांधकामासाठी घेतलेले कर्ज न फेडल्याने अखेर बीडचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ताब्यात घेऊन सील करण्याची कारवाई द्वारकादास मंत्री बँकेने केली.नगर पालिकेने या नाट्यगृहाच्या माध्यमातून लाखो रुपये उत्पन्न मिळवले मात्र बँकेला दमडी न भरल्याने अखेर या कारवाईला सामोरे जावे लागले.

येथील व्दारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेने बीड नगर परिषदेच्या नाट्यगृहाचे बांधकामाकरिता कर्ज दिले होते.सदरील कर्ज देऊन १० वर्षाचे वर कालावधी होऊनही कर्जाची रक्कम न भरल्यामुळे व्दारकादास मंत्री बँकेच्या प्राधिकृत अधिकारी यांनी आज सरफेसी कायद्या अंतर्गत सांकेतिक ताबा घेतला आहे.

बीड नगर परिषदेने नाट्यगृह बांधकामा करिता व्दारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेने सामाजिक बांधिलकीची जान ठेवून शहराच्या वैभवात भर पडावी या हेतूने सन २००६ मध्ये १,००,००,०००.०० रुपये (अक्षरी रुपये एक कोटी) कर्ज दिले होते कर्जाची रक्कम नगर पालिकेने मुदतीत भरणे आवश्यक होते.

नगर पालिकेने घेतलेले कर्ज भरणा करणेसाठी बँकेचे मॅनेजर,वसुली अधिकारी व कर्मचारी यांनी वारंवार लेखी नोटीस दिल्या व समक्ष पाठपुरावा देखील केला परंतु नगर पालिकेने काही वर्ष फक्त व्याज भरणा केला व पुढील काळात व्याज देखील थकवले सदरील कर्ज एन पी ए मध्ये गेले त्याकरिता बँकेचे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी धेखील नगर परिषद मुख्याधिकारी यांचेशी वारंवार संपर्क साधला असता नकारात्मक प्रतिसाद मिळाला त्या कारणाने बँकेने पुढील कायदेशीर कार्यवाही करत सेक्युरिटायझेशन अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अॅण्ड इन्फोर्समेंट ऑफ सेक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट २००२ केंद्रीय कायदा २००२ नं.५४ चे अंतर्गत प्राधिकृत अधिकारी यांनी सदर कायदयाचे कलम १३ (२) अन्वये तसेच उक्त नियमाच्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून दिनांक २३/०३/२०२३ रोजी व्दारकादास मंत्री नागरी सहकारी बँक लि.बीड शाखा महिला चे कर्जदार मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांना नोटीस मध्ये नमूद केलेली रक्कम रु.१,०१,४६,०९४.०० त्यावर दि.२३/०३/२०२३ पासून पुढे होणारे व्याज ६० दिवसाच्या आत भरणा करण्यासाठी मागणी नोटीस देण्यात आली होती.

सदरील मुदत संपल्यानंतरही बँकेचे अधिकाऱ्यांनी कर्ज रक्कम भरण्यासाठी पाठपुरावा केला परंतु नगर परिषद बीड यांनी वरील नोटीसमध्ये नमूद केलेल्या रकमेचा भरणा न केल्यामुळे बँकेने आपले मालमत्तेचा ताबा घेण्यात येईल या आशयाची नोटीस कलम १३ (४) देखील नगर परिषद बीड यांना दि.२५/०५/२०२३ रोजी दिली तरीही नगर परिषद बीड यांनी याची दखल घेतली नाही व कर्ज बाकी भरली नाही म्हणून सरफेसी कायद्याचे नियम ८ (१) अधिकाराचा वापर करून नाविलाजाने बँकेस बीड शहराची शान असलेल्या व नेहमीच सामाजिक सांस्कृतिक कार्यासाठी उपलब्ध होत असलेल्या बीड च्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कर्जाचे वसुली साठी नगर परिषद बीड ने बँकेस नोंदणीकृत गहाणखत करून दिलेल्या नाट्यगृहाचा दिनांक १६/०६/२०२३ रोजी बँकेने प्रतिकात्मक ताबा घेतलेला असल्याची माहिती बँकेचे प्राधिकृत अधिकारी श्री प्रशांत बोन्दार्डे यांनी दिली आहे.

यावेळी बँकेचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री एस.एच.मोमीन कर्मचारी श्रीमती.डोक्रस ,कुलकर्णी, लोहिया मॅडम ,श्री. वावरे, मानुरकर , परसे , कचरे ई.कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. श्री प्रशांत बोन्दार्डे प्राधिकृत अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *