News & View

ताज्या घडामोडी

Tag: #देवेंद्र फडणवीस

  • दादा वित्तमंत्री तर डीएम कृषिमंत्री !

    मुंबई- गेल्या दहा ते बारा दिवसापासून रखडलेलं राज्य सरकारचे खातेवाटप जाहीर झाला असून अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन तर बीडचे धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे आता अब्दुल सत्तार हे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राज्य मंत्रिमंडळात 5 जुलै रोजी सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे…

  • चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा,विजयकुमार गावित, सुरेश खाडे यांची गछन्ति !

    बुधवारी मंत्रिमंडळ विस्तार अन फेरबदल !! मुंबई- राज्य मंत्रिमंडळात दहा दिवसांपूर्वी अजित पवार अँड कंपनीचा समावेश झाल्यानंतर फेरबदल आणि विस्ताराची चर्चा सुरू झाली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी 12 जुलै रोजी राजभवनात विस्तार होणार आहे.यामध्ये भाजपच्या पाच प्रमुख मंत्र्यांना वगळण्यात येणार असून शिवसेनेचे देखील चार मंत्री घरी बसवण्यात येणार आहेत.भाजपकडून चंद्रकांत पाटील यांच्या सहित दिग्गजांना बदलण्यात येणार…

  • मंत्र्यांना बंगले,दालनाचे वाटप खात्यावरून घोडे अडले !

    मुंबई- अजित पवार यांच्यासह आठवडाभरापूर्वी शपथ घेतलेल्या नऊपैकी आठ मंत्र्यांना मंत्रालायत दालन आणि बंगल्याचे वाटप झाले आहे.मात्र खात्यावरून घोडे अडल्याने सगळाच घोळ सुरू आहे.धनंजय मुंडे यांना प्रचितगड हे निवासस्थान आणि दुसऱ्या मजल्यावर 201 ते 204 आणि 212 क्रमांकाचे दालन देण्यात आले आहे. 5 जुलै रोजी राज्याच्या राजकारणात अजित पवार यांच्या रूपाने मोठा राजकीय भूकंप घडला.राष्ट्रवादी…

  • पंकजा मुंडे नक्की वाचा !ब्रेक के बाद !!

    विशेष संपादकीय/लक्ष्मीकांत रुईकर पंकजा मुंडे यांनी माध्यमांमध्ये सुरू असलेल्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेवर पूर्णविराम दिला.हे करताना त्यांनी अनेक गोष्टी उघड केल्या.त्यांना गेल्या चार वर्षात कशा पद्धतीने डावलले गेलं,कसा अन्याय झाला हे सांगितले ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकलं. पंकजा मुंडे यांचा स्वभाव बघता त्यांना सल्ला दिलेला आवडत नाही किंवा त्या कोणाच्या सल्ल्यानुसार निर्णय घेत नाहीत.2014  ते 2019…

  • राजकारणातून एक्झिट घेणार- पंकजा मुंडेंच्या दाव्याने खळबळ !

    मुंबई- मी वीस वर्षांपासून राजकारणात आहे मात्र तत्त्वाशी कधीच तडजोड केली नाही.सध्या राज्यातजे सुरू आहे किंवा अवतीभवती जे सुरू आहे ते पाहून कंटाळा आला आहे.मी दुःखी आहे,अशा पध्दतीने तडजोडी कराव्या लागल्या तर मी राजकारणातून एक्झिट घेईल असा दावा भाजपच्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी केला. पंकजा मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत काही बातम्या आल्यानंतर संतापलेल्या पंकजा यांनी…

  • अजित पवार उपमुख्यमंत्री !

    मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शपथ घेतली.त्यांच्यासोबत छगन भुजबळ,दिलीप वळसे पाटील,हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे,धर्मराव बाबा आत्राम, यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून तर आदिती तटकरे ,अनिल पाटील आणि संजय बनसोडे यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याच्या राजकारणात रविवारी जो भूकम्प आला त्याचे हादरे सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस ला बसले.राष्ट्रवादी काँग्रेस मधील…

  • संदिप क्षीरसागर शरद पवारांसोबत !

    बीड- राज्याच्या राजकारणात रविवारी एकीकडे राजकीय भूकंप घडत असताना बीड विधानसभा मतदार संघाचे आमदार संदिप क्षीरसागर हे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत असल्याचे दिसून येत आहे. राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार,छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ,आदिती तटकरे,धर्मराव आत्राम,संजय बनसोडे यांच्यासारखे दिगग्ज नेते सरकारमध्ये सामील होत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील….

  • देवभाऊ तुमचं चुकलंच !

    विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर देवा भाऊ तुमचं खरंच चुकलं, तुम्ही जेव्हा शाळेत होता तेव्हा म्हणजेच 70 च्या दशकात शरद पवारांनी राजकारणातलं पहिलं बंड केलं आणि पाठीत खंजीर खुपसणे हा वाक्प्रचार ऑक्सफर्ड डिक्शनरीत लिहिला गेला. आता पवारांचं बंड आणि त्यांनी वेळोवेळी स्वपक्षीयांना ब्लॅकमेल करत आपलं मांडलेलं दुकान आणि आपल्याच पक्षासोबत वेळोवेळी केलेला धोका सर्वसामान्य वाडी…

  • दप्तर दिरंगाई मुळे नोकर भरती रखडली !

    बीड- एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 75 हजार बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याची घोषणा करत असताना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे नोकर भरतीबाबत सुधारित आकृतिबंध तयार नसल्याने भरती रखडल्याचे समोर आले आहे.जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये दप्तर दिरंगाई केल्याने त्याचा फटका नोकर भरतीकडे डोळे लावून बसलेल्या बेरोजगार तरुणांना सहन करावा लागत आहे. राज्य शासकीय सेवेतील ७५ हजार…

  • रिक्षाने तुमची मर्सिडीज खड्यात घातली- मुख्यमंत्री शिंदे !

    मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. या रिक्षाने तुमच्या मर्सिडीज ला खड्यात घातलं,मी दोन दिवस गावाला गेलो तर मुख्यमंत्री गावाला गेले म्हणून चर्चा केली,तुम्ही तर असूच वर्षात दोनदाच मंत्रालयात आलात,आमच्या वर आरोप करण्या अगोदर तुम्ही काय वागलात हे बघा.येणाऱ्या काळात खोके कोणाला भेटत होते हे सगळं बाहेर…