News & View

ताज्या घडामोडी

मंत्र्यांना बंगले,दालनाचे वाटप खात्यावरून घोडे अडले !

मुंबई- अजित पवार यांच्यासह आठवडाभरापूर्वी शपथ घेतलेल्या नऊपैकी आठ मंत्र्यांना मंत्रालायत दालन आणि बंगल्याचे वाटप झाले आहे.मात्र खात्यावरून घोडे अडल्याने सगळाच घोळ सुरू आहे.धनंजय मुंडे यांना प्रचितगड हे निवासस्थान आणि दुसऱ्या मजल्यावर 201 ते 204 आणि 212 क्रमांकाचे दालन देण्यात आले आहे.

5 जुलै रोजी राज्याच्या राजकारणात अजित पवार यांच्या रूपाने मोठा राजकीय भूकंप घडला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या30 पेक्षा अधिक आमदारांनी भाजप सेना युतीच्या सरकारला पाठिंबा दिला.त्यातील अजित पवार,दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ,आदिती तटकरे,धर्मराव बाबा आत्राम,अनिल पाटील आणि संजय बनसोडे या नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

त्यानंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये ज्या घटना घडामोडी घडल्या त्या सर्वांनी पाहिल्या. गेल्या दिवसात नव्या मंत्र्यांना खाती वाटप झालेली नाहीत.त्यामुळे शिवसेना,भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये बराच गोंधळ सुरू आहे.

दरम्यान मंत्र्यांना खाती वाटप झालेली नसली तरी बंगल्याचे आणि मंत्रालयातील दालनाचे वाटप मात्र मंगळवारी करण्यात आले.छगन भुजबळ यांना सिद्धगड,दिलीप वळसे पाटील यांना सुवर्णगड, धनंजय मुंडे यांना प्रचितगड,धर्मराव बाबा आत्राम याना सुरुची 3,अनिल पाटील यानासुरुची 8 आणि संजय बनसोडे याना सुरुची 18 हे बंगले देण्यात आले आहेत.अजित पवार यांच्याकडे पूर्वीचाच देवगिरी बंगला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *