News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • ग्रामपंचायत निवडणुकीचा आखाडा रंगणार !

    ग्रामपंचायत निवडणुकीचा आखाडा रंगणार !

    मुंबई – गेल्या दहा महिन्यापासून लांबलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे.ऐन दिवाळीच्या तोंडावर या ग्रामपंचायत मध्ये मतदान होणार आहे. राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी…

  • पोराबाळासहित गुत्तेदारी करणाऱ्या लाड कडे कार्यकारी अभियंत्याचा चार्ज !

    पोराबाळासहित गुत्तेदारी करणाऱ्या लाड कडे कार्यकारी अभियंत्याचा चार्ज !

    बीड- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील जल जीवन मिशन योजनेचा बीड जिल्ह्यात बट्याबोळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई ऐवजी त्यांचे लाड होऊ लागले आहेत.आपल्या मुलाला अन नातेवाईकांना कोट्यवधी रुपयांची कामे देऊन गुत्तेदारी करणाऱ्या एम आर लाड कडे कार्यकारी अभियंता पदाचा चार्ज देऊन जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने नेमकं काय साध्य केलं आहे असा सवाल उपस्थित होत आहे. बीड जिल्हा…

  • अग्रीम चे वाटप का रखडले – आ क्षीरसागर यांचा सवाल !

    अग्रीम चे वाटप का रखडले – आ क्षीरसागर यांचा सवाल !

    बीड – संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे शेतकरी अर्थिक विवंचनेला तोंड देत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना आर्थिक आधार देणे गरजेचे आहे. बीड जिल्ह्यासाठी मंजूर २५ टक्के अग्रीम पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांना वितरीत करण्यात यावा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.…

  • सावकार भिडले ! जालना रोडवर दगडफेक, काहीकाळ तणाव !!

    सावकार भिडले ! जालना रोडवर दगडफेक, काहीकाळ तणाव !!

    बीड- बीड शहरातील जालना रोडवर सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सावकारांचे दोन गट एकमेकाला भिडले.यामध्ये कोठारी नामक सावकारांना जोरदार मारहाण झाली तर त्यांच्या माणसांनी दुसऱ्या गटातील लोकांवर दगडफेक केली. या सगळ्या प्रकारामुळे काहीकाळ जालना रोडवर तणाव निर्माण झाला होता. सोमवारी दुपारी एक ते दोन वाजण्याच्या सुमारास कोठारी नामक सावकार आणि प्लॉटिंग चा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीकडे…

  • मोक्कातील फरारी आरोपींना ठोकल्या बेड्या !

    मोक्कातील फरारी आरोपींना ठोकल्या बेड्या !

    बीड- सीबीआय चे पोलिस असल्याचे सांगत लूटमार करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले.यातील एक आरोपी हा मोक्का अंतर्गत फरार होता.तब्बल वीस पेक्षा अधिक गुन्ह्यात हवे असलेले हे आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहेत. हयात अली बाबूलाल अली आणि मिस्किन जावेद जाफरी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.मागील महिन्यात या आरोपीनी अंबाजोगाई लातूर…

  • ट्रॅफिक पोलिसांना धाब्यावर दारू तपासायचे अधिकार आहेत का ?

    ट्रॅफिक पोलिसांना धाब्यावर दारू तपासायचे अधिकार आहेत का ?

    बीड- शहर वाहतूक असो की जिल्हा वाहतूक शाखा ,या शाखेला राज्य अथवा राष्ट्रीय महामार्गावरील धाबे किंवा हॉटेल तपासणीचे अधिकार आहेत का ? निश्चितच नाहीत,मात्र बीडमधील ट्रॅफिक पोलीस शासकीय वाहनातून जालना रोडवरील धाब्यावर धाडी टाकल्याचे दाखवून तोडीपाणी करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. बीड शहर आणि जिल्हाभरात गणेश विसर्जन शांततेत पार पडले.यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात…

  • कुलकर्णी साहेब माटे ला घरी पाठवायला मुहूर्त पाहताय का ?

    कुलकर्णी साहेब माटे ला घरी पाठवायला मुहूर्त पाहताय का ?

    बीड- प्राथमिक शिक्षक असतानाही बोगस कागदपत्रे जोडून शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळवणाऱ्या सिद्धेश्वर माटे यांच्यावर शिक्षण विभाग भलताच मेहेरबान असल्याचे चित्र आहे माटे यांच्या विषयी तत्कालीन गटशिक्षणाधिकारी टेकाळे यांनी सविस्तर अहवाल दिल्यानंतर देखील चौकशी समितीच्या नावाखाली शिक्षणाधिकारी कुलकर्णी हे माटेंना पाठीशी घालत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे कुलकर्णी साहेब माटे यांना घरी पाठवण्यासाठी…

  • पंकजा मुंडेंच्या कारखान्यावर कारवाई !

    पंकजा मुंडेंच्या कारखान्यावर कारवाई !

    बीड- परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने जप्तीची कारवाई केली आहे.19 कोटी रुपयांचे साहित्य या विभागाने पोलीस बंदोबस्तात जप्त केले.भाजप नेत्या पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या कारखान्यावर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला केंद्रीय जीएसटी आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्त कार्यालयाच्या पथकाने नोटिसा बजावल्या होत्या.…

  • जिल्ह्यातील आठ महसूल मंडळात अतिवृष्टी !

    जिल्ह्यातील आठ महसूल मंडळात अतिवृष्टी !

    बीड- जिल्ह्यात शनिवारी दुपारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे आष्टी,अंबाजोगाई आणि परळी तालुक्यातील आठ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली.धानोरा मंडळात तब्बल 132 मिमी पावसाची नोंद झाली.या पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्याचे,शेतीचे नुकसान झाले. आष्टी तालुक्यातील आष्टी मंडळ (68.8 mm), कडा मंडळ (93.5 mm), दौलावडगाव मंडळ (89.8 mm), पिंपळा (72.3 mm) व धानोरा मंडळ (132.5 mm) तसेच अंबेजोगाई तालुक्यातील अंबेजोगाई…

  • शंभर टक्के अग्रीम देऊन बळीराजाला साथ द्या- आ क्षीरसागर !

    शंभर टक्के अग्रीम देऊन बळीराजाला साथ द्या- आ क्षीरसागर !

    बीड- यावर्षी जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाने दोन अडीच महिने ओढ दिली.त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक करपून गेले.महाग मोलाचे बियाणे वाया गेले.शेतात काहीच पिकलं नाही.त्यामुळे कोलमडून पडलेल्या बीड जिल्ह्यातील बळीराजाला सरकारने साथ द्यावी.शंभर टक्के अग्रीम मंजूर करावा अशी मागणी बीडचे आ संदिप क्षीरसागर यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १०० टक्के अग्रीम द्या आ.संदीप क्षीरसागर यांची मागणी बीड मतदारसंघासह…