News & View

ताज्या घडामोडी

माटे, आतकरे, बाहेगव्हाणकर यांची चौकशी सुरू !

बीड- बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षण विस्तार अधिकारी असणारे वादग्रस्त सिद्धेश्वर माटे,शिवाजी आतकरे आणि निखिल बाहेगव्हाणकर यांची विभागीय चौकशी सुरू झाली आहे.त्यांच्याशी संबंधित कागदपत्रे त्यांच्या कार्यालयाकडून मागवली आहेत,त्यांना या बोगस कामात मदत करणाऱ्यांवर सुद्धा सीईओ पाठक कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षक असताना बेकायदेशीर पध्दतीने शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळवलेले सिद्धेश्वर माटे हे सुरवातीपासूनच वादात अडकलेले आहेत. नियमबाह्य पध्दतीने पदोन्नती मिळवणे,वरिष्ठांना दुरुत्तरे देणे,कर्तव्यात कसूर करणे,नागरिकांशी गैरवर्तन करणे आदि कारणावरून त्यांच्या विरुद्ध सीईओ अविनाश पाठक यांनी विभागीय चौकशी प्रस्तावित केली होती.

तसेच सहायक लिपिक असणारे शिवाजी आतकरे आणि निखिल बाहेगव्हाणकर या दोघांविरुद्ध देखील विभागीय चौकशी प्रस्तावित केली होती.आम्ही न्यायालयात दाखल असलेल्या केसेस पेंडिंग ठेवू शकतो तर विभागीय चौकशी का नाही पेंडिंग ठेवणार.कोणाला कस मॅनेज करायचं हे आम्हाला चांगलं माहीत अस म्हणत सीईओ पाठक असो की इतर कोणी आम्हाला फरक पडत नाही अस म्हणणारे माटे यांची सगळी कागदपत्रे सामान्य प्रशासन विभागाने मागवून घेतली आहेत,त्यामुळे माटे यांची चौकशी सुरू झाली असून कडक कारवाई होणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *