News & View

ताज्या घडामोडी

नगर पालिकेने मजूर पुरवठा करणाऱ्या गुत्तेदारावर उधळले कोट्यवधी रुपये !

बीड- बीड नगर पालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून आंधळ दळतंय अन कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था झालेली आहे.2017 मध्ये करण्यात आलेल्या लेखा परीक्षण अहवालात अनेक त्रुटी काढण्यात आलेल्या आहेत. वेगवेगळ्या कामासाठी मजूर पुरवठा करणाऱ्या शेख अफसर नावाच्या गुत्तेदारावर कोट्यवधी रुपयांची खैरात उधळण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

बीड नगर पालिकेतील गणेश पगारे अन सलीम ट्रेसर यांच्या गौरकारभाराचे अनेक किस्से समोर येत आहेत.2017 मध्ये नगर पालिकेचे स्पेशल ऑडिट करण्यात आले. त्यामध्ये देखील अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.

या अहवालात म्हटल्याप्रमाणे शेख अफसर शेख अली नावाच्या गुत्तेदाराने पाणी पुरवठा योजनेतील लिकेज काढण्यासाठी मजूर पुरवठा करण्याचे टेंडर भरले.वास्तविक हे टेंडर भरण्यास हा गुत्तेदार किंवा त्याची फर्म पात्र नव्हती.मात्र तरीदेखील त्याला नियमबाह्य पध्दतीने काम देण्यात आले.

शेख अफसर याचे टेंडर मंजूर करताना कोणत्याही प्रकारे प्रशासकीय मान्यता किंवा तांत्रिक मान्यता घेण्यात आली की नाही याची माहितीच लेखा परीक्षक यांना देण्यात आली नाही.त्याचप्रमाणे या गुत्तेदाराने 5 टक्के व्हॅट भरणे आवश्यक असताना त्याने तो न भरल्याने नगर परिषदेचे तब्बल पाच लाख 25 हजार 734 रुपयांचे नुकसान झाले.

विशेष बाब म्हणजे यावेळी रोखपाल असणाऱ्या कर्मचाऱ्याने हा सगळा सावळा गोंधळ केला.या आणि अशा अनेक गोष्टी या अहवालात उघड झालेल्या आहेत,मात्र शासनाकडून त्यावर अद्याप कसलीही कारवाई झालेली नाही हे विशेष.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *