News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • तब्बल 21 दिवस दिवाळीच्या सुट्या !

    तब्बल 21 दिवस दिवाळीच्या सुट्या !

    बीड- जिल्हा परिषदेच्या शाळांना आणि खाजगी शाळांना दिवाळीच्या सुट्या 6 नोव्हेंबर पासून असतील.तब्बल 21 दिवस ही सुट्टी असणार आहे.28 नोव्हेंबर रोजी शाळा पुन्हा सुरू होतील असे आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांनी काढले आहेत. राज्यातील सर्वच शाळांना वर्षभरात एकूण 76 सुट्या दिल्या जातात.त्यामध्ये उन्हाळी सुट्या आणि दिवाळीच्या सुट्यांचा विशेष समावेश असतो.बीड जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत…

  • आदित्य धन्वे सस्पेंड ! दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई कधी !!

    आदित्य धन्वे सस्पेंड ! दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई कधी !!

    बीड- बलात्काराचा दाखल असलेला गुन्हा दडवून जिल्हा परिषदेत नोकरी मिळणाऱ्या आदित्य अनुप धन्वे यास दहा वर्षाची शिक्षा ठोठावल्या प्रकरणी जिल्हा परिषदेचे सीईओ अविनाश पाठक यांनी निलंबित केले आहे.मात्र त्याला चारित्र्य प्रमाणपत्र देणारे पोलीस अधिकारी, रुजू करून घेणारे जिल्हा आरोग्य अधिकारी आणि ओळख दाखवून साक्षांकन देणारे समाज कल्याण अधिकारी यांच्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित…

  • जवान तावरेंच्या पार्थिवावर सोमवारी गावाकडे अंत्यसंस्कार !

    जवान तावरेंच्या पार्थिवावर सोमवारी गावाकडे अंत्यसंस्कार !

    बीड -उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या ढगफुटीमुळे तिस्ता नदीला महापूर आला या पुरात वाहून गेल्याने बीड जिल्ह्यातील काकडहिरा गावचे जवान पांडुरंग वामन तावरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव पुणे येथे पोहचले आहे. उद्या सोमवारी मुळगाव असलेल्या काकडहिरा येथे सकाळी 10 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा…

  • सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्यांना मिळणार कुरण !

    सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्यांना मिळणार कुरण !

    बीड- राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये,वैद्यकीय महाविद्यालय आणि औषध भांडार येथे रुग्णसेवेसाठी लागणारी औषधे स्थानिक पातळीवर खरेदी करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे.यामुळे आता सत्ताधारी मंडळींच्या कार्यकर्त्यांना आणि गुत्तेदारांना खाण्यासाठी कुरण उपलब्ध होणार आहे. नांदेड येथील स्व शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे राज्यभरात खळबळ उडाली. हे मृत्यू…

  • बीजलवाड ला कारणे दाखवा नोटीस !

    बीजलवाड ला कारणे दाखवा नोटीस !

    बीड-बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी जी पी बीजलवाड यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सीईओ अविनाश पाठक यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.तीन दिवसात उत्तर द्या अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा देण्यात आला आहे. शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी जी पी बीजलवाड यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या.त्यामुळे बीड जिल्हा परिषदेचे सीईओ पाठक यांनी…

  • बलात्काराच्या आरोपीला पोलिसांनी दिले निल कॅरेक्टर सर्टिफिकेट !

    बलात्काराच्या आरोपीला पोलिसांनी दिले निल कॅरेक्टर सर्टिफिकेट !

    एसपी ठाकूर चौकशी करणार का ? बीड- जिल्हा व सत्र न्यायालयाने आदित्य अनुप धनवे या आरोपीला बलात्कार प्रकरणात दहा वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली.या आरोपीने आपल्यावरील गुन्हा लपवून जिल्हा परिषदेत नोकरी मिळवली होती.विशेष बाब म्हणजे ज्या शहर पोलिसात त्याच्यावर गुन्हा दाखल होता त्याच ठाण्याने त्याला निल कॅरेक्टर सर्टिफिकेट कसकाय दिले असा प्रश्न उपस्थित होत आहे.पोलीस अधीक्षक…

  • डॉ साबळे यांचे निलंबन रद्द !

    डॉ साबळे यांचे निलंबन रद्द !

    बीड- बीड जिल्हा शासकीय रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांचे करण्यात आलेले निलंबन आज 6 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅटने रद्द ठरविले आहे.यामुळे आता डॉ. सुरेश साबळे हे पुन्हा जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून काम पाहणार आहेत. डॉ. सुरेश साबळे यांच्यावर कंत्राटी भरतीचा ठपका ठेवत आरोग्य मंत्र्यांनी विधीमंडळात त्यांच्या निलंबनाची घोषणा केली होती. त्यानंतर आरोग्य…

  • बेपत्ता जवानाच्या शोधासाठी पालकमंत्री मुंडेंनी यंत्रणा लावली कामाला !

    बेपत्ता जवानाच्या शोधासाठी पालकमंत्री मुंडेंनी यंत्रणा लावली कामाला !

    मुंबई (दि. 05) – सिक्कीम मध्ये मंगळवारी पहाटे झालेल्या ढगफुटी मध्ये बीड जिल्ह्यातील पांडुरंग तावरे हे देश सेवेसाठी तैनात असलेले जवान मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असून त्यांच्याबद्दल सलामतीची माहिती मिळण्यासाठी हैराण असलेल्या कुटुंबीयांना आज जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी संपर्क करून धीर दिला आहे. सदर जवानाची माहिती तातडीने मिळावी व त्यांचा शोध घेऊन त्याची माहिती…

  • बलात्कारातील आरोपी करतोय जिल्हा परिषदेत नोकरी !

    बलात्कारातील आरोपी करतोय जिल्हा परिषदेत नोकरी !

    बीड- अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणात दहा वर्षाची शिक्षा झालेला आरोपी आदित्य अनुप धन्वे हा बोगस चारित्र्य प्रमाणपत्र जोडून शासनाची फसवणूक करत तब्बल सहा वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या सेवेत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. जिल्हा परिषद सीईओ अविनाश पाठक यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीड जिल्हा परिषद मध्ये मार्च 2019 साली आदित्य अनुप…

  • ढगफुटी मध्ये बीडचा जवान बेपत्ता !

    ढगफुटी मध्ये बीडचा जवान बेपत्ता !

    बीड- कर्तव्यावर असताना ढगफुटी झाल्याने बीडचे जवान पांडुरंग तावरे हे तीन दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत.पती बेपत्ता झाल्याने त्यांच्या पत्नीसह कुटुंबीय हैराण झाले आहेत. सिक्कीममध्ये मंगळवारी पहाटे १.३० वाजता झालेल्या ढगफुटी झाली. त्यामुळे तिस्ता नदीला पूर आला होता. नदीच्या पाण्याची पातळी १५ ते २० फुटांनी वाढली. यानंतर नदीलगतच्या भागात पूर आला. नदीलगतच्या परिसरात लष्कराची छावणी होती,…