News & View

ताज्या घडामोडी

स्वेच्छा निवृत्ती घेतली एकाने नोकरी दिली दुसऱ्याला ! बीड नगर पालिकेचा भोंगळ कारभार !!

बीड- बीड नगर पालिकेत भोंगळ कारभार सुरू असल्याचे अनेकवेळा उघड झाले आहे.एखाद्या कर्मचाऱ्याने स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर अनुकंपा प्रमाणे वारसांना नोकरीचा लाभ मिळत नाही मात्र बीड नगर पालिकेने चक्क हा लाभ दिला आणि तो ही रक्ताच्या नात्याचा संबंध नसलेल्या व्यक्तीला. नगर पालिकेतील शेख खमरोद्दीन या कर्मचाऱ्याने स्वेच्छा निवृत्ती घेतली .त्यानंतर नगर पालिकेने प्रदीप वडमारे या व्यक्तीला खमरोद्दीन यांच्या जागेवर नोकरीवर घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.ही नोकरी देताना खमरोद्दीन यांच्या नातेवाईक आणि मुलांकडून शपथपत्र घेऊन बेकायदेशीर नोकरी देण्यात आली.ही गोष्ट 2017 पासून सर्व स्टाफ आणि सीओ यांना माही असून देखील अद्याप कसलीच कारवाई करण्यात आलेली नाही हे विशेष.

बीड नगर पालिका ही अ वर्ग नगर पालिका आहे,मात्र पदाधिकारी असोत की प्रशासन यांनी कारभाराची पुरती वाट लावून टाकली आहे.नगर पालिकेचा कारभार हा कोणीही यावे अन टिकली मारून जावे असा झाला आहे.विशेष बाब म्हणजे गेल्या दीड दोन वर्षांपासून प्रशासक आल्यानंतर तर नगर पालिकेचा कारभार जास्तीच ढेपळला आहे.

नगर परिषदेच्या असो की इतर कुठल्याही शासकीय कार्यालयात एखादा कर्मचारी नोकरीस असेल आणि त्यानं स्वेच्छा निवृत्ती घेतली तर त्याच्या वारसांना लाभ मिळत नाही.मात्र बीड नगर पालिकेला बहुदा हा नियम लागू नसावा त्यामुळे नगर परिषदेने स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याचा प्रयत्न केला.

विशेष बाब म्हणजे ही नोकरी त्या कर्मचाऱ्यांच्या घरातील, रक्ताच्या वारसांना दिली गेली नाही तर थेट त्याच्या वारसा कडून शपथपत्र घेत दुसऱ्याच व्यक्तीला नोकरी दिली.

शेख खमरोद्दीन यांनी 2017 मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली,त्यावेळी त्यांचे वारस असणारे शेख नईम,शेख बीबी अमीना आणि जानी बेगम खमरोद्दीन यांनी शपथपत्र दिले की प्रदीप संभाजी वडमारे यांना वडिलांच्या जागेवर नोकरीस घेण्यास आमचा कसलाही विरोध नाही.

त्यानंतर नगर परिषद प्रशासनाने 2017 मध्ये प्रदीप वडमारे यांना सफाई कामगार म्हणून नोकरीस घेतले.हा प्रकार म्हणजे शासनाच्या नियमांची पायमल्ली करत फसवणूक करण्यासारखा आहे.2017 पासून ही बाब सर्व अधिकारी कर्मचारी यांना माहीत असताना देखील यावर कोणीही कसलीच कारवाई केलेली नाही.

स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर अनुकंपा प्रमाणे वारसांना नोकरीचा लाभ मिळत नाही मात्र बीड नगर पालिकेने चक्क हा लाभ दिला आणि तो ही रक्ताच्या नात्याचा संबंध नसलेल्या व्यक्तीला.या सगळ्या प्रकारात नगर परिषदेतील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठी माया गोळा केली असल्याची चर्चा आहे.या प्रकरणात जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील तक्रार झाली मात्र अद्याप काहीच कारवाई झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *