News & View

ताज्या घडामोडी

सुनील केदार यांची आमदारकी रद्द !

नागपूर- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा ठोठावलेले काँग्रेस चे आ सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.

नागपूर पोलिसांनी कोर्टाचे आदेश विधीमंडळास पाठवले होते, त्यानंतर केदार यांच्या आमदारकीचा निर्णय आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात गेला. त्यानंतर आता काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.

राज्याचे माजी पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (एनडीसीसी) कोट्यवधी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळ्यात शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण सहा आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली. तर इतर तीन आरोपी निर्दोष सुटले आहेत.

बँकेत हा घोटाळा झाला त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होते. एकूण ११ पैकी ९ आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ४०६ (विश्वासघात), ४०९ (शासकीय नोकर आदींद्वारे विश्वासघात), ४६८ (बनावट दस्तऐवज तयार करणे), ४७१ (बनावट दस्तऐवज खरे भासविणे), १२०-ब (कट रचणे) व ३४ (समान उद्देश) हे दोषारोप निश्चित करून हा खटला चालविण्यात आला. आता या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *