News & View

ताज्या घडामोडी

IMG 20261020 WA0015

पाटील मॅडम 10 हजार, सावंत सर 15 हजार,स्वामी सर 20 हजार!कुप्पा शाळेने चिकटवले विद्यार्थी खरेदी रेटकार्ड!

बीड – पटसंख्या मॅनेज करून शिक्षकांची अतिरिक्त ठरणारी पदे वाचवण्यासाठी बीडच्या चंपावती शाळेमध्ये उघडतेस आलेला विद्यार्थी खरेदी विक्री चा कुटाणा किरकोळ वाटेल असा प्रकार वडवणी तालुक्यातील कुप्पा येथील राजेसाहेब विद्यालयात उघडकीस आला आहे या विद्यालयात चक्क कोणत्या शिक्षकाने किती विद्यार्थ्यांनी त्या पोटी त्यांना किती रुपये संस्था चालकांनी दिले याचे रेट कार्ड शाळेत चिकटवण्यात आले आहे. ज्यामध्ये पाटील मॅडम 10000 स्वामी सर 20000 सावंत सर पंधरा हजार यांच्यासहित जवळपास सगळ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाने किती विद्यार्थ्यांची खरेदी विक्री झाली हे चिकटवण्यात आले आहे असे असतानाही बीडचा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभाग मात्र झोपेचे सोंग घेऊन या बोगसपणा करणाऱ्या संस्थाचालकांना पाठीशी घालत आहे हे विशेष.

सह सम्पूर्ण राज्यात आणि देशात पटसंख्या मॅनेज करण्यासाठी विद्यार्थ्यांची खरेदी विक्री केली जाते आणि त्याला शिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी मदत करतात हे जगजाहीर आहे. मात्र यावेळी या खरेदी विक्री प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत.

बीडच्या चंपावती शाळेत मुख्याध्यापक सारंग जोशी यांनी उत्तराखंड येथील तीन विद्यार्थी खरेदी केले तसेच इंग्लिश स्कुल मधील 292 विद्यार्थी आपल्या मराठी शाळेत प्रवेश असल्याचे दाखवले. त्यावरून त्यांच्यावर नीलम्बनाची कारवाई झाली तसेच गुन्हा देखील दाखल झाला.

आता असाच आणि यापेक्षा भयानक प्रकार वडवणी तालुक्यात उघडकीस आला आहे.

शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारा एक अत्यंत संतापजनक आणि गंभीर प्रकार बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उघडकीस आला आहे. बोगस शिक्षक भरती वाचवण्यासाठी आणि शासनाचे कोट्यवधी रुपयांचे पगार लाटण्यासाठी चक्क विद्यार्थ्यांच्या दाखल्यांची (T.C.) एक विद्यार्थी चि हजारो रुपयांत खरेदी-विक्री करण्यात आल्याचा महाप्रताप उघड झाला आहे.

image editor output image2033811456 1792479876478
वरील फोटो हा शाळेच्या स्टाफ रूममध्ये लावलेला आहे, यावर पाटील मॅडम, स्वामी सर, सावंत सर,जाधव सर, गायकवाड मॅडम,राऊत मॅडम यांना दिलेले पैसे आणि त्यांनी आणलेले विद्यार्थी यांची संख्या लिहिलेली आहे.

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील ‘राजेसाहेब विद्यालय, कुप्पा’ येथील कार्यालयात कोणत्या शिक्षकाने किती रुपयांत किती विद्यार्थ्यांची टी.सी. विकत घेतली, याची सविस्तर यादीच कार्यालयाच्या भिंतीवर लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या संपूर्ण महाघोटाळ्याप्रकरणी भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य याचे अध्यक्ष इंजिनिअर सादिक बाबामिया इनामदार यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.
नेमका काय आहे महाप्रताप?

image editor output image1919165046 1792480184001
या यादीमध्ये जिजामाता विद्यालय,बाळू बादडे आणि संभाजीनगर येथील सर यांना दिलेले पैसे तसेच प्रत्येक शाळेतून आणलेले विद्यार्थी यांची नावे आहेत.


संस्थाचालकांनी बोगस शिक्षकांकडून लाखो रुपयांचे डोनेशन घेऊन बेकायदेशीर शिक्षक भरती केली. ही शिक्षक पदे टिकवण्यासाठी आणि शासनाचा पगार लाटण्यासाठी बोगस पटसंख्या (विद्यार्थी) दाखवणे आवश्यक होते. यासाठी बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध शाळांमधील मुख्याध्यापकांनी संगणमत करून विद्यार्थ्यांची विक्री केली.


राजेसाहेब विद्यालय, कुप्पा येथील कार्यालयात चक्क एक तक्ताच चिकटवण्यात आला आहे. या यादीमध्ये:
कोणत्या शिक्षकाने कोणत्या शाळेकडून विद्यार्थी विकत घेतले?
एका टी.सी.साठी (T.C.) किती हजार रुपये मोजले?
एकूण खर्च आणि विद्यार्थ्यांची नावे काय आहेत?
या सर्व बाबींचा स्पष्ट उल्लेख असल्याने शिक्षण विभागाचा बोगस कामाचा पडदा फास केला गेला आहे. शासनाची उघडउघड फसवणूक करून राज्य सरकारच्या तिजोरीवर मारलेला हा थेट दरोडाच आहे.
अधिकारी, संस्थाचालक आणि कर्मचाऱ्यांचे मोठे संगणमत!
हा केवळ एका शाळेचा प्रकार नसून यामध्ये मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
शिक्षण उपसंचालक कार्यालय (छत्रपती संभाजीनगर)
माध्यमिक शिक्षण विभाग (जिल्हा परिषद, बीड)
वेतन अधीक्षक कार्यालय
संस्थाचालक, मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख
या सर्वांनी संगणमत करून या बोगस विद्यार्थ्यांची देवाणघेवाण लपवण्याचे आणि बेकायदेशीर व्यवहार पचवण्याचे काम केले आहे.
तात्काळ गुन्हे दाखल करून निलंबन करा – इंजिनिअर सादिक इनामदार
या महाघोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी आणि दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष इंजिनिअर सादिक इनामदार यांनी तक्रार अर्ज सादर केला आहे.
या तक्रारी संदर्भात एसआयटी (SIT) समिती,
शिक्षण आयुक्त, पुणे, शिक्षण संचालक (माध्यमिक), पुणे,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड , शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर , शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, बीड हे काय कार्यवाही करणार आहेत या कडे सर्व महाराष्ट्र चे लक्ष लागले आहे.

“बोगस शिक्षक वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांची अशी लाजीरवाणी खरेदी-विक्री करून शासनाची फसवणूक करणाऱ्या संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे; अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा ईशारा इंजिनिअर सादिक इनामदार यांनी दिला आहे.

IMG 20261020 WA0009

​

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *