News & View

ताज्या घडामोडी

राजस्थानी मल्टिस्टेट बंद ! ठेवीदारांची गर्दी !!

बीड- कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आणि मार्केटमध्ये एक वेगळी ओळख असलेल्या राजस्थानी मल्टीस्टेट च्या शाखा गेल्या दोन ते तीन दिवसापासून अचानक बंद झाल्याने ठेवीदारांनी शाखा समोर एकच गर्दी केली आहे मल्टीस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल बियाणे यांच्या समर्थनार्थ एकीकडे परळीत त्यांचे फॉलोवर्स रस्त्यावर उतरून त्यांना सपोर्ट करत असताना दुसरीकडे शाखा बंद झाल्याने ठेवीदार अडचणीत आले आहेत

बीड जिल्ह्यात गेल्या वर्ष दीड वर्षात अनेक सहकारी पतसंस्था मल्टीस्टेट अर्बन निधी बँक बंद पडल्या आर्थिक नियोजनाचा अभाव असल्यामुळे परिवर्तन मातोश्री ज्ञानराधा साईराम मा जिजाऊ मासाहेब यासारख्या अनेक पतसंस्थांना कुलूप लागलं पतसंस्थेत ठेवीदारांनी ठेवलेला पैसा हा आपल्या बाप जाद्यांनी कमुन ऐश करण्यासाठी आपल्याला दिला आहे अशा पद्धतीने या पतसंस्था चालकांनी हा पैसा गुळ उद्योग प्लॉटिंग जमिनीचे खरेदी विक्री सोन्या-चांदीचे व्यवहार शेअर मार्केट या ठिकाणी गुंतवला.

ठेवीदारांनी कोट्यावधी रुपये हातात दिल्यामुळे स्वतःला आमदार खासदाराच्या वर समजणारे हे मल्टीस्टेट चे मालक ठेवीदारांच्या पैशावर गाड्या घोड्या घेऊन मिरवू लागले मात्र ही आलेली सूज हळूहळू वसू लागली आणि अनेक पतसंस्था मल्टीस्टेट बंद पडू लागल्या

गेवराईच्या गणेश चे बीडच्या मल्टिस्टेट सोबत काय कनेक्शन ,लवकरच कागदपत्रे सादर करणार !

बीडमध्ये जिजाऊ मासाहेब नंतर ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये अडचणी निर्माण झाल्या सुरेश कुटे लोकांना रोज आवाहन करत असले तरी पैसे मात्र मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे त्यानंतर साईनाथ परभणे यांच्या मल्टीस्टेट अर्बन ला कुलूप लागले आणि आता चंदुलाल बियाणी यांच्या राजस्थानी मल्टीस्टेटच्या शाखा तीन दिवसापासून बंद दिसत असल्याने ठेवीदार हैराण झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *