Category: बीड
-

ट्रक -दुचाकीचा अपघात :तीन मित्रांचा मृत्यू!
बीड –बीड नजीक असलेल्या उखंडा तलावाजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन तरुण मित्रांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. हे तिघे तरुण नवगण राजुरी येथील रहिवाशी असून या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. कैलास टुले, ऋषिकेश फुलझळके आणि अक्षय शिंदे अशी मृतांची नावे आहेत. अहिल्यानगर बीड महामार्गाचे काम सध्या सुरु आहे. त्यामुळे अनेक…
-

दुष्काळ प्रश्नावर मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घ्या -धनंजय मुंडेंची मागणी!
मुंबई – बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळसदृश परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे येत्या 17 सप्टेंबर रोजी किंवा तत्सम कालावधीत लवकरात लवकर मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करून दुष्काळजन्य परिस्थितीवर उपाययोजना व शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व…
-

सोनवणेच्या संस्थेत गडबड घोटाळे :दोन मुलं डॉक्टर पण कागदावर मास्तर अन क्लर्क!
बीड –बीड जिल्हा परिषदेचे माजी उपशिक्षणाधिकारी तथा माजी शिक्षणाधिकारी ज्ञानोबा सोनवणे यांची दोन मुलं डॉक्टर आहेत, त्यातील एक डेंटिस्ट अन दुसरा आयुर्वेदिक, मात्र त्यांच्या शिक्षणावर लाखो रुपये खर्च करूनही ते दवाखान्यात नं बसता संस्थेच्या शाळेवर अन कॉलेजवर नोकरी करतात, पण ती सुद्धा कागदोपत्री. कारण हे दोन्ही चिरंजीव ना ज्यावेळी दवाखान्यात असतात त्याचवेळी ते शाळेत अन…
-

कुंडलिका नदीवरील ५ बंधाऱ्यांना मिळणार ‘एलिप्टिकल’ चे कवच!
माजलगाव -माजलगाव मतदारसंघांसाठी वरदान ठरणाऱ्या कुंडलिक नदीवरील पाच कोल्हापूर पद्धगीच्या बंधाऱ्यांचे आधुनिकीकरण होणार आहे. आयुष्यमान भारत मिशनचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांच्या सासत्याच्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याला मंजुरी दिली असून जलसंपदा विभागाने त्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले आहे. माजलगाव,धारूर व वडवणी तालुक्याच्या जिवनदायिनी असलेल्या कुंडलिका नदीवरील पाच कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे आधुनिक…
-

आयुर गायनॅक क्लिनिक चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा!
बीड -बीड शहरातील अंबिका चौक परिसरात असलेल्या आयुर गायनॅक या आयुर्वेदिक क्लिनिक चा प्रथम वर्धापन दिन भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख आणि भाजपच्या गटनेत्या डॉ सारिकाताई क्षीरसागर यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. अलीकडच्या काळात आयुर्वेदिक उपचारांना मोठे महत्व आले असल्याचे मतदान यावेळी डॉ सारिका क्षीरसागर यांनी व्यक्त केले. तर डॉ रसिका पारगावकर यांच्या पुढील वाटचालीस शंकर…
-

वडील सचिव, एक मुलगा अध्यक्ष, दुसरा कोषाध्यक्ष, सुनबाई प्रिन्सिपल, काका सदस्य!
बीड -बीड जिल्ह्यातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था किंवा चंपावती शिक्षण संस्थाच नव्हे तर सगळीकडेच घोटाळे असल्याचे समोर येतं आहे. बीडचे माजी शिक्षणाधिकारी ज्ञानोबा सोनवणे यांच्या संस्थेत तर कुटूंब कबीलाच्या हातात सगळा कारभार आहे. ज्ञानोबा सोनवणे स्वतः आदर्श महाराष्ट्र बहुउद्देशीय संस्थेचे सचिव आहेत तर मोठा मुलगा अध्यक्ष, दुसरा मुलगा कोषाध्यक्ष आणि भाऊ सदस्य तर सुनबाई प्रिन्सिपल…
-

मुक्तीसंग्राम दिनी रेल्वेला पुण्यापर्यंत गती, डिसेंबर पर्यंत मुंबईशी कनेक्तीव्हीटी!
मुंबई- बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारी ‘बीड–पुणे’ रेल्वे येत्या १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुहूर्तावर धावणार असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक व सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच डिसेंबरअखेर बीड–मुंबई (पनवेल) रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व कामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा बीड…
-

ग्रामरोजगार सहायकास लाच घेताना अटक!
बीड –लिंबारुई येथील ग्रामरोजगार सहायक याला साठ हजार रुपयांची लाच घेताना छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. या कारवाईने खळबळ उडाली आहे. मुकेश सोनाजी भोकरे (वय 47), ग्रामरोजगार सहायक, लिंबारुई, ता. बीड, असे लाच स्वीकारताना पकडण्यात आलेल्या कर्मचार्याचे नाव आहे. तक्रारदाराने नरेगा योजनेअंतर्गत शेतविहिरीचे काम केले होते. या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी…
-

करपरा नदीतील भिंत बांधकामावर महसूलची कारवाई!
बीड –बीड शहरातील सुमती नगर भागातुन वाहणाऱ्या करपरा नदीमध्ये मधोमध भुमाफियानी भिंत बांधून नदीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरु केला होता. याबाबत न्यूज अँड व्यूज ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर महसूल विभागाच्या पथकाने तातडीने कारवाई करत संबंधित शेतकऱ्यांना नोटीस दिली आहे. सदरील बेकायदेशीर भिंत बांधकाम बंद करून महसूल विभागाने भुमाफियाना दणका दिला आहे. बीड शहरातील नदी, नाले,…
-

करपरा पाठोपाठ बिंदूसरा नदीत भिंत उभारून नदी गिळंकृत करण्याचा डाव!
बीड –बीड शहरातील भुमाफियानी नदी, नाले, ओढे, ओपन स्पेस ढापण्याचे काम सुरु केले आहे. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या नदी पुनःरुज्जीवन आणि संवर्धन यासाठी प्रयत्न करत असताना बीडमध्ये मात्र भुमाफिया नदीत भिंती उभारू लागले आहेत. करपरा नदीत भिंत उभराल्यानंतर आता बिंदूसरा नदीतदेखील भिंत बांधून भुमाफियानी नदीवर अतिक्रमण केले आहे. प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचे…

