Category: बीड
-

पूर्णवादी ने जपले ग्राहकहीत, विमा क्लेम मंजूर!
शिरूर कासार -भारतीय आयुर्विमा महामंडळा मार्फत भरलेला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने अंतर्गत पूर्णवादी नागरि सहकारी बँकेच्या ग्राहकाने केलेला क्लेम मंजूर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करत बँकेच्या शिरूर शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ग्राहकहीत जोपासले आहे. पदमजा कुलकर्णी यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसाना दोन लाख रुपयाचा क्लेम बँकेने मंजूर करून दिला. देशातील सर्वच सहकारी बँकामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योत…
-

बालिकेवरील अत्याचार प्रकरणी बीडमध्ये सर्वपक्षीय निदर्शने!
बीड –पुणे जिल्ह्या नरसापूर येथे घडलेल्या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्याल्यावर मोर्चा काढण्यात आला. आ संदीप क्षीरसागर, भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, नगर परिषद उपाध्यक्ष विनोद मुळूक यांच्यासह महिला, पुरुषांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आरोपीला फासावर देण्याची मागणी केली. पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे घडलेली अल्पवयीन मुलीवरील अत्यंत निंदनीय आणि…
-

विकसित बीड घडविण्याचा संकल्प करूया -सुनेत्रा पवार!
बीड- मराठवाड्याची भूमी ही संतांची, महंतांची, शूरांची, वीरांची, बुद्धीवंतांची आणि कर्तृत्ववान सुपुत्रांची भूमी आहे. या भूमीला धैर्याचा, शौर्याचा, संघर्षाचा वारसा आहे. संत गोरोबाकाकांच्या पवित्र तेर नगरीत माझा जन्म झाल्यामुळे माझे या भूमीशी एक अतूट नातं आहे. मराठवाड्याची लेक म्हणून या मातीतल्या संस्कारांचा आणि वारशाचा मला अत्यंत अभिमान आहे. आपण सर्वजण एकत्र येऊन विकसित, सक्षम आणि…
-

पूर्णवादी बँक प्रकरणात आरोपी देवळे ला अटक!
जालना -पूर्णवादी नागरि सहकारी बँकेच्याजालना शाखेतून तब्बल आठ कोटींपेक्षा जास्त रकमेचा अपहार केल्याप्रकरणी बँकेचा शाखाधिकारी शिरीष देवळे याला जालना पोलिसांनी जेरबंद केले आहे. पूर्णवादी बँकेच्या जालना शाखेचा शाखाधिकारी शिरीष देवळे याने पंचमुखी वेअर हाऊसचे मालक यांच्याशी संगणमत करून आठ कोटी बारा लाख 92 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून…
-

मसाजोग पोटनिवडणूक :संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव!
बीड –केज तालुक्यातील मस्साजोग चे सरपंच स्व संतोष देशमुख यांच्या हत्येंनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी नुकतीच निवडणूक झाली. यामध्ये संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. स्वरूपानंद देशमुख यांनी 92 मतांनी विजय मिळवला. जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, अत्यंत चुरशीच्या लढतीत स्वरूपानंद देशमुख यांनी…
-

आजपासून खत विक्रेत्यांचा राज्यव्यापी बंद!
बीड -राज्यातील खत व बी बियाणे विक्रेत्यांवर लिंकिंग च्या नावाखाली कंपन्याकडून केली जाणार दडपशाही तसेच अप्रामाणित बियाणांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यासंह इतर मागण्यांसाठी राज्यातील खत व बी बियाणे विक्रेत्यांनी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे.राज्याचे अध्यक्ष विनोद तराळ पाटील व महासचिव विपिन कासलीवाल यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये राज्यभर बंद पुकारण्यात आला आहे. विशेषतः देशातील सर्व राज्य आज…
-

जिल्हा रुग्णालयात चोऱ्या :सीएस सोळंके यांचे अक्षम्य दुर्लक्ष!
बीड – बीड जिल्हा रुग्णालयाचा कारभार म्हणजे आंधळं दळतय अन कुत्र पीठ खातय असा झाला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश सोळंके यांचा प्रशासनावर वचक नसल्याने इथे चोऱ्याचे प्रकार होऊ लागले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालय परिसराची पाहणी करत सूचना दिल्या असल्या तरी या सोळंके महाशयांच्या ढिसाळ कारभाराबाबत मात्र त्यांनी कठोर पावले उचलून कारवाई करणे अपेक्षित आहे.जिल्ह्याचे…
-

बीड च्या गटशिक्षणाधिकारी पदी भगवान सोनवणे तर उपशिक्षणाधिकारी म्हणून धनंजय शिंदे यांची नियुक्ती
बीड -जिल्हा तांत्रिक सेवेमधील विस्ताराधिकारी या संवर्गातून शिक्षण सेवा गट ब प्रशासन शाखा मधील उपशिक्षणाधिकारी व तत्सम संवर्गातील रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरूपातआज दि. 24 एप्रिल 2025 रोजी आदेश निर्गमित झाले आहेत. बीडच्या गटशिक्षणाधिकारी पदावर भगवान सोनवणे यांची तर उपशिक्षणाधिकारी म्हणून धनंजय शिंदे यांची निवड झाली आहे. 1) धनंजय मारुतीराव बोंदार्डे (गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जामखेड जिल्हा…
-

जालना मर्चंट मधील गैरव्यवहाराशी पूर्णवादी चा संबंध नाही :ग्राहकांनी काळजी करू नये!
बीड –जालना मर्चंन्ट बँकेत झालेल्या गैरव्यवहाराशी पूर्णवादी बँकेचा काहीही संबंध नाही. या बँकेत जो गैरव्यवहार झालेला आहे त्याबाबतीत आमच्या बँकेने गुन्हे दाखल केले आहेत, तसेच उर्वरित लोकांकडून वसुलीची प्रक्रिया सुरु आहे. बँकेच्या ग्रहकांनी काळजी करू नये असे आवाहन बँकेचे अध्यक्ष डॉ सुभाष जोशी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी यांनी केले आहे. पूर्णवादी बँकेच्या सर्व…
-

देशपांडे हल्ला प्रकरण :खोटा गुन्हा मागे घ्या, शिष्टमंडळाने घेतली एसपी कावत यांची भेट!
बीड -निवडणुकीतील पराभवाचा राग मनात ठेवून p पराभूत उमेदवार बाळासाहेब जाधव यांनी पाच दिवसापूर्वी भाजप नगरसेविका सौ भाग्यश्री देशपांडे यांचे पती सागर देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर त्यांच्यावर आणि त्यांचे वडील अरुणराव देशपांडे यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा मागे घेण्यात यावा तसेच जाधव याच्यावर कठोर कारवाई करावी आणि या प्रकरणात खोटा गुन्हा…



