Category: महाराष्ट्र
-

नियती सगळ्यांचा हिशोब करते -धनंजय मुंडे!
पाथर्डी – गेल्या वर्ष दीड वर्षांपासून मीडिया ट्रायल मुळे अडचणीचा सामना करणारे माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी नारायणगड आणि भगवानगड येथील नारळी साप्ताहाला भेट देत आशीर्वाद घेतले. नियती सगळ्यांचा हिशोब करत असते त्यामुळे कोणाचा द्वेष करू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कोणी आपल्याला दोष देवो किंवा आपलं द्वेष करो, आपण मात्र कोणाला दोष द्यायचा…
-

पटपडताळणी अगोदरच माध्यमिक विभागाने शिक्षक ठरवले अतिरिक्त!
बीड –राज्यभरात पटपडताळणी करून अतिरिक्त झालेल्या शिक्षकांची यादी तयार करावी आणि त्यानंतर त्यांचे समायोजन करावे असे आदेश शिक्षण संचालक यांनी दिले. मात्र बीडच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी पटपडताळणी पूर्ण होण्या अगोदरच अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध केल्यामुळे शंका निर्माण झाली आहे. संस्थाचालकांच्या संगणमताने तर अतिरिक्त शिक्षकांची यादी तयार केली गेली नाही ना अशी चर्चा सुरु झाली…
-

2017 नंतरच्या शिक्षक, कर्मचाऱ्यांची होणार चौकशी!
मुंबई -राज्यातील नागपूर, जळगाव, अमरावती येथील शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आल्यापासून नेमण्यात आलेल्या एसआयटी कडे तपास देण्यात आला. आता 2017 नंतर नोकरीत रुजू झालेल्या शिक्षकांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीमार्फत आता चौकशी होणार आहे. त्यामुळे शिक्षक, संस्थाचालक यांचे धाबे दनाणले आहेत. नागपूरमध्ये ६५०, नाशिकमध्ये ८०० तर अन्य जिल्ह्यांमध्ये देखील शेकडो शिक्षकांच्या शालार्थ…
-

खरात प्रकरणात दमानिया यांचा उपमुख्यमंत्री शिंदेवर गंभीर आरोप!
मुंबई -भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. खरात याचे कॉल डिटेल समोर आणत त्यांनी रुपाली चाकणकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या ‘कॉल डिटेल रेकॉर्ड’चा (CDR) हवाल्याने धक्कादायक माहिती सार्वजनिक केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि रुपाली…
-

अशोक खरात ची न्यायालयीन कोठडीत रवानगी!
बीड -महिलांचे लैंगिक शोषण प्रकरणी अटक केलेल्या भोंदूबाबा अशोक खरात ला बुधवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. खरात च्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले असून अनेक राजकारणी आणि अधिकाऱ्यांचे धाबे दनाणले आहेत. न्यायालयाने या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेत अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली जाणार आहे. न्यायालयाने…
-

चोरी जीवावर बेतली, दोघांचा मृत्यू!
केज –विजेच्या तारीची चोरी दोघांच्या जीवावर बेतली आहे. टॉवर वर चढून तार चोरी करताना टॉवर कोसळले आणि यामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बीडच्या केज तालुक्यात उभारण्यात आलेल्या हाय व्होल्टेज टॉवरवर चढून तार चोरीचा प्रयत्न करताना टॉवरच कोसळल्याची घटना शनिवारी रात्री घडली. यामध्ये दोन चोरट्यांचा मृत्यू झाला. यानंतर या…
-

भोंदू खरातच्या कोठडीत वाढ!
नाशिक -महिलांवर अत्याचार करणारा लिंगपिसाट भोंदू बाबा अशोक खरात यांच्या पोलीस कोठडीत 1 एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे. खरात तपासात सहकार्य करत नसल्याने न्यायालयाने त्याच्या कोठडीत वाढ केली. महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या खरातचा तपास करण्यासाठी एसआयटीला (SIT) अधिक कालावधीची गरज असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे. आज सकाळी 11:30 वाजता…
-

व्हिडीओ व्हायरल केले, बीडसह तीन तरुणावर गुन्हे दाखल!
बीड –लिंगपिसाट भोंदू बाबा अशोक खरात याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या तीन आंबट शौकीन तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका तरुणाचा समावेश आहे. त्यामुळे यापुढे हे व्हिडीओ व्हायरल करताना दहा वेळा विचार करा. नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कारनामे बाहेर आले आणि एकाच खळबळ उडाली.…
-

पोस्ट ऑफिस बॉम्बने उडवून देण्याची धमकी, बीडमध्ये खळबळ!
बीड -राज्यातील सर्वच पोस्ट ऑफिस बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली. सकाळी बीडच्या मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये बॉम्ब शोध पथक आणि पोलीस दल दाखल झाले. दुपारपर्यंत यामुळे पोस्ट ऑफिस बंद होते. स्वतःला ‘कोयंबटूरचे मुसलमान’ म्हणवून घेणाऱ्या एका अज्ञात गटाने हा ई-मेल पाठवला आहे. या संदेशात अत्यंत प्रक्षोभक भाषेत धमक्या देण्यात आल्या आहेत.…
-

खरात प्रकरणी चाकणकर यांचा राजीनामा!
मुंबई – भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पहिली विकेट पडली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही तासापूर्वी याबाबतचे संकेत दिले होते. चाकणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. नाशिकचा भोंदू अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण…



