बीड -निवडणुकीतील पराभवाचा राग मनात ठेवून p पराभूत उमेदवार बाळासाहेब जाधव यांनी पाच दिवसापूर्वी भाजप नगरसेविका सौ भाग्यश्री देशपांडे यांचे पती सागर देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर त्यांच्यावर आणि त्यांचे वडील अरुणराव देशपांडे यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा मागे घेण्यात यावा तसेच जाधव याच्यावर कठोर कारवाई करावी आणि या प्रकरणात खोटा गुन्हा दाखल करून घेणाऱ्या पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी एका शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे केली.
शहरातील कबाड गल्ली येथे 10 एप्रिल 2026 रोजी आपल्या घरासमोर उभे असलेले सागर देशपांडे यांच्यावर बाळासाहेब जाधव व इतर चार ते पाच जणांनी जीवघेणा हल्ला केला.
नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत सागर देशपांडे यांच्या पत्नीचा विजय झाला तर बाळासाहेब जाधव हे पराभूत झाले. याबरून गेल्या दोन तीन महिन्यात अनेकदा जाधव याने देशपांडे यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. जातायेता शिवीगाळ करणे, भांडण करणे असे प्रकार सुरूच होते. 10 एप्रिल रोजी रात्री देशपांडे यांना एकट्याला गाठून जीवघेणा हल्ला केला.
यावेळी सागर देशपांडे हे एकटेच होते. त्यांचे वडील घराच्या गॅलरीत उभे होते. या घटनेचे सिसिटीव्ही फुटेज उपलब्ध आहे.
हा सगळा प्रकार झाल्यानंतर बीड शहर पोलिसांनी जाधव यांच्या तक्रारीवरून सागर देशपांडे आणि त्यांचे वडील अरुणराव देशपांडे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. सिसिटीव्ही फुटेजमध्ये अरुणराव देशपांडे हे घटनास्थळी हजर नाहीत, घराच्या गॅलरीत आहेत हे दिसत असतानाही जाणीवपूर्वक बल्लाळ यांनी खोटा गुन्हा दाखल करून घेतला.

बाळासाहेब जाधव याच्यावर यापूर्वी सुद्धा मटका चालवणे, गैरकायद्याची मंडळी जमवून गोंधळ करणे, पोलिसांवर हल्ला करणे असे अनेक गुन्हे आहेत, तरीदेखील बल्लाळ यांनी अशा आरोपीला पाठीशी घातले. याबाबत सर्वपक्षीय शिष्टमंडळाने बुधवारी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. त्यांना सत्य परिस्थिती कथन केली. त्यानिदेखील चौकशी करून गुन्हा मागे घेण्याबाबत आश्वासन दिले आहे.
कावत यांना निवेदन देण्यासाठी भाजप नेते डॉ योगेश क्षीरसागर, भाजप शहराध्यक्ष अशोक लोढा. जेष्ठ पत्रकार दिलीप खिस्ती, संपादक महेश वाघमारे, भाजप महिला आघाडीच्या नेत्या ऍड संगीताताई धसे, नगरसेविका सौ भाग्यश्री देशपांडे, सागर देशपांडे, प्रसाद राजेंद्र, ऍड दीपक कुलकर्णी, ऍड आनंद पाटील,नगरसेवक जगदीश गुरखूदे, नगरसेवक शुभम धूत, डॉ रवींद्र घुमरे,प्रमोद पुसरेकर, चंद्रकांत जोशी, दुर्गादास बुवा जोशी, चंद्रकांत फड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.





Leave a Reply Cancel reply