News & View

ताज्या घडामोडी

240 172269472266ae3c42b28b6 ee6111a4193fb522e1393178cdd10a9e

उपसंचालकांच्या अहवालात दोषी असणारे शिंदे शिक्षणाधिकारी यांच्या अहवालात क्लीन!

बीड -बीडचे वादग्रस्त निलंबित शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात परळीच्या एकाच शाळेत झालेल्या घोटाळ्यात उपसंचालक यांनी दिलेल्या अहवालात शिंदे दोषी ठरले, त्यांच्यावर नीलम्बनाची कारवाई झाली मात्र त्यानंतर सहा महिन्यांनी बीडच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांच्या चौकशीत शिंदे यांना क्लीनचिट देण्यात आली. परळीच्या त्या शाळेत कसलाही अपहार झाला नाही असे देखील पाटील यांनी म्हटले. उपसंचालक यांच्या अहवालाला चॅलेंज करण्याचाच हा प्रकार आहे. नेमकं कोणाच्या सांगण्यावरून पाटील यांनी हा बोगस अहवाल दिला अशी चर्चा सुरु आहे.

बीड जिल्ह्यात शालार्थ आयडी मध्ये मोठा घोटाळा झालेला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते सादिक इनामदार यांनी शिक्षक संचालक यांच्यापासून ते मंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्या होत्या. विशेषत परळीच्या वैद्यनाथ शिक्षण संस्थेत मंजूर पदापेक्षा तब्बल 27 पदे अतिरिक्त भरल्याचे उघड झाले.

तत्कालीन शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी या पदाना मंजुरी देत शासनावर तब्बल 25 कोटी रुपयांचा भार टाकला. तसेच शिंदे यांच्या कार्यकाळात जवळपास 982 पैकी 785 संचिका गहाळ झाल्याचे उघड झाले होते.

या बाबत तक्रार झाल्यानंतर ऑक्टोबर 25 मध्ये उपसंचालक प्रकाश मुकुंद यांनी चौकशी अहवाल दिला, ज्यामध्ये शिंदे हे दोषी असल्याचे तसेच वैद्यनाथ शिक्षण संस्था प्रकरणात त्यांनी पटसंख्ये पेक्षा अधिकची पदे मंजूर करून आणि त्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी साठी मदत करून शासनाची 25 कोटी रुपयांना फसवणूक केल्याचे स्पष्ट म्हटले होते.

या अहवालच्या आधारे शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतर पुन्हा माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांनी एप्रिल 26 मध्ये पुन्हा एकदा चौकशी केली. ही चौकशी कार्यालयात बसूनच केली कि काय अशी शंका आहे. कारण एकीकडे उपसंचालक यांच्या अहवालात शिंदे दोषी ठरतात आणि पाटील यांच्या अहवालात निर्दोष कसकाय ठरतात अशी चर्चा आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते सादिक इनामदार यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शिंदे आणि प्राथमिक चे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी निलंबित झाले. परंतु बीडच्या शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांनी कोणत्या पुराव्याच्या आधारावर शिंदे यांना क्लीनचिट दिली, त्यासाठी नेमका त्यांच्यावर कोणाचा दबाव होता अशी चर्चा सूरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version