News & View

ताज्या घडामोडी

images 1

मिलिया शाळेला दणका!अनधिकृत भागशाळा बंद करण्याचे आदेश!

बीड – येथील मिलिया शाळेने गेल्या अनेक वर्षांपासून सुरु केलेली गांधीनगर भागातील अनधिकृत भागशाळा बंद करण्याचे आदेश देत एक लाख रुपयांचा दंड बीडच्या प्राथमिक शिक्षण विभागाने ठोठवला आहे. शाळा बंद न केल्यास दररोज दहा हजार रुपये दंड करण्यात येईल असे देखील नोटीस मध्ये म्हटलं आहे.

बीड सह जिल्ह्यात अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तसेच कॉलेज असलेल्या मिलिया संस्थेला बीडच्या शिक्षण विभागाने मोठा दणका दिला आहे  मिलीया प्राथमिक शाळेच्या वतीने शहरातील गांधीनगर भालदार पुरा आणि बालेपिर या तीन ठिकाणी अनधिकृत पणे भाग शाळा भरवण्यात येत होत्या.

राज्यात कोठेही भागशाळा सुरू करण्याची परवानगी नसताना बीडच्या मिलिया शाळेने सर्व नियम धाब्यावर बसून गेल्या अनेक वर्षापासून शहरात गांधीनगर भालदार पुरा आणि बालेपिर या भागात भाग शाळा सुरू केल्या.

या अनधिकृत भाग शाळांबाबत अनेक वेळा  चालकांनी अधिकाऱ्यांना मॅनेज करून हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क गोळा केले तसेच शासनाकडून देखील वाढीव तुकड्या आणि शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या नावाने कोट्यावधी रुपये उकळले.

अनधिकृत भागशाळा भरवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बीडच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी किरण कुंवर यांनी शाळेला नोटीस पाठवली आहे. ज्यामध्ये भागशाळा तातडीने बंद करविवारी, तसेच एक लाख रुपये दंड भरावा आणि दिलेल्या मुदतीत शाळा बंद न केल्यास दररोज दहा हजार रुपये दंड करण्यात येईल असे देखील नोटीस मध्ये म्हटलं आहे.

बीडच्या शिक्षण विभागाने उशिरा का होईना पण मिलिया शाळेवर जी कारवाई केली आहे ती अर्धवट असून या शाळेच्या बालपिर आणि भालदार पुरा येथील भाग शाळा देखील तातडीने बंद करण्यात याव्यात अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version