बीड – कोणत्याही कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती अर्थात डेपुटेशन करावयाचे असल्यास विभागीय आयुक्तांची परवानगी लागते मात्र बीड जिल्ह्यात वेगळाच कायदा चालतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या स्टोर कीपर पदावर तसेच जिल्हा रुग्णालयाच्या स्टोर कीपर पदावर प्रतिनियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे जो कमवून देणार त्यालाच क्रीम पोस्ट मिळणार असा फंडा बीडच्या अनेक प्रशासकीय विभागात सुरू असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
राज्याचं प्रशासकीय वातावरण एकीकडे आणि बीडचे दुसरीकडे असं नेहमीच पाहायला मिळतं. जिल्हा परिषद असो महसूल प्रशासन असो की पोलीस प्रशासन प्रत्येक ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संगणमाथातून शासनाला चुना लावण्याचा प्रकार बिनधास्त सुरू असतो.
विशेषतः ज्या पदावर मोठ्या प्रमाणात वर कमाई आहे त्या ठिकाणी पात्रता नसलेले पण जोडे उचलणारे आणि अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळणारे कर्मचारी नियुक्त करण्याचा प्रकार बीडमध्ये सर्रास आढळतो. बीडच्या जिल्हा रुग्णालयातून दीड दोन वर्षांपूर्वी बदली झालेल्या तानाजी ठाकर नावाच्या कर्मचाऱ्याकडे पुन्हा एकदा जिल्हा रुग्णालयाच्या स्टोअरचा कारभार देण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे या ठाकर महाशयांची स्टोअर मध्ये असताना गैरकारभार केल्याप्रकरणी विभागीय चौकशी सुरू आहे तरी देखील जिल्हा शल्यचिकित्सक सोळंके यांनी ठाकर कडे पुन्हा एकदा स्टोअर कीपर पदाचा अतिरिक्त पदभार देऊन स्वतःचे आणि ठाकरचे उखळ पांढरे करण्यास संमती दिली आहे. रुग्णालयाच्या स्टोअर मध्ये मूळ स्टोर कीपर जो रे तानाजी ठाकर चव्हाण आणि अन्य एक जण असे चौघे काम पाहतात या ठिकाणी चार कर्मचाऱ्यांची खरोखर आवश्यकता आहे का ? हे देखील न तपासता ठाकरला डेकोरेशन वर का दिले गेले अशी चर्चा होऊ लागली आहे.
दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात स्टोअर कीपर म्हणून कार्यरत असणारे महाशय देखील गेल्या अनेक वर्षापासून डेपो टेशन वर काम करत आहेत या महाशयांनी वेगवेगळे टेंडर मॅनेज करायचे आपल्या मर्जीतील गुत्तेदारांनाच काम द्यायचे वेगवेगळ्या मेडिकल कंपन्यासोबत आपल्या जवळच्या लोकांच्या फॉर्मच्या नावाने कामे घ्यायची असे प्रकार केलेले आहेत. या महाशयांचे डेकोरेशन करता येत नाही हे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उल्हास गंडाळ यांना माहीत असताना देखील ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.





Leave a Reply Cancel reply