बीड-गेवराई तालुक्यातील नूतन कोळेश्वर विद्यालय कोळगाव येथे बनावट कागदपत्रे, पालक व विद्यार्थ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या, बनावट प्रवेश अर्ज आणि इतर शाळांमधून बेकायदेशीररित्या आणलेल्या दुबार दाखल्यां (T.C.) द्वारे बोगस पटसंख्या दाखवून शासनाची कोट्यवधी रुपयांची महाफसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती गेवराई यांनी केलेल्या प्रत्यक्ष शासकीय चौकशीत हा घोटाळा सिद्ध झाला असूनही, बीड जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी श्रीमती प्रिया राणी पाटील उपशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे व कार्यालयीन अधीक्षक अजय बहिर हे दोषींवर गुन्हे दाखल न करता प्रकरण दाबण्यासाठी मोठया प्रमाणावर आर्थिक देवाण-घेवाण करत असल्याचा आरोप भ्रष्टाचार निर्मूलन समिती, महाराष्ट्र राज्य द्वारे करण्यात आला आहे.
शासकीय चौकशी अहवालात फसवणूक सिद्धः
भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या तक्रारीनुसार (दि. १५/१०/२०२६, जावक क्र. ८१५) मा. गटशिक्षणाधिकारी गेवराई यांच्या पथकाने दि. २१/१०/२०२६ रोजी प्रत्यक्ष शाळेची तपासणी केली. दि. २६/१०/२०२६ (जावक क्र. आस्था-१/२६२१) द्वारे सादर केलेल्या शासकीय चौकशी अहवालात इयत्ता १० वी च्या एकाच वर्गात १९ बोगस विद्यार्थी प्रवेशित दाखवून शासनाची व शिक्षण विभागाची संगनमताने फसवणूक केल्याचे निर्विवादपणे सिद्ध झाले आहे.
घोटाळ्याचे भयानक स्वरूप व बेकायदेशीर पद्धतः
शासकीय नियमानुसार ३० सप्टेंबरची पटसंख्या संचमान्यतेसाठी धरली जाते. संस्था सचिव मल्लिकार्जुन माधवराव नावंदे, मुख्याध्यापक रमेश वैजनाथराव वाघलारे, वरिष्ठ लिपिक वैजनाथ व्हात्ते, मंगेश मुगळे व बोगस T.C. पुरवणारा नागनाथ नावंदे यांनी कट रचून नापास झालेले, शाळा सोडून गेलेले, विवाह झालेल्या मुली व इतर जिल्ह्यांतील शाळांमधून बेकायदेशीरपणे आणलेले टी.सी. वापरून बोगस विद्यार्थ्यांची नोंद ‘सरल’ प्रणालीवर केली. या फुगवलेल्या संचमान्यतेच्या आधारे अतिरिक्त शिक्षक पदे मंजूर करून लाच घेऊन नियुक्त्या करण्याचा व बेकायदेशीर पगार लाटण्याचा हा मोठा कट आहे.
इयत्ता १० वी मधील १९ बोगस विद्यार्थ्यांची यादी (नूतन कोळेशोर विद्यालय, कोलगाव विद्यार्थ्यांचे नावकु. प्रांजली विशाल गायकवाडकु. अश्विनी निवृत्ती महागुंडेइयत्ता१० वी१० वीकु. कोमल जालिंदर बराटे१० वीकु. वर्षां जालिंदर बराडे१० वीकु. दिक्षा मधुकर उधरे१० वीकु. दिक्षा मनोहर शेडगे१० वीचि. निखिल सर्जेराव गायकवाड१० वीचि. ओंकार लक्ष्मण रूपनर१० वीकु. राधिका भिंडू बोराडे१० वी१०चि. शिवम भरत लोंढे१० वी१०कु. सोनाली मुक्ताराम बहिर१० वी१२कु. अक्षरा अमोल खेडकर१० वी१३कु. प्रियंका प्रकाश सोनवणे१० वी१४चि. कार्तिक रंगनाथ जाधव१० वी१५चि. रितेश कंदलवार१० वी१६पि. रोहित कंदलवार१० वीकु. रविना सुनिल लोड१० वी१८चि. कार्तिक गायकवाड१० वी१९चि. दत्ता पवार१० वी
उपरोक्त १९ विद्यार्थ्यांमध्ये वर्ग १० वीत नापास झालेले, शाळा सोडून गेलेले विद्यार्थ्यांचे नावे पुनरप्रवेश/पुनःप्रवेश दाखवून, लग्न झालेल्या मुलींचे पुन्हा प्रवेश दाखवून व डुप्लिकेट (T.C.) दाखवून सदर संस्थेच्या अनेक शाखा वेगवेगळ्या जिल्ह्यात असून त्या अनेक शाखांच्या प्रवेश मधील विद्यार्थ्यांची T.C. जिथे जास्त विद्यार्थी आहेत तेथील T.C. दुसऱ्या शाळेत कमी विद्यार्थी असलेल्या शाळेत आधी काढले आहेत.
कायदेशीर मागण्या व कडक इशाराः
संस्था सचिव मल्लिकार्जुन नावंदे, मुख्याध्यापक रमेश वाघलारे, वरिष्ठ लिपिक वैजनाथ हात्ते, मंगेश मुगळे व नागनाथ नावंदे यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) गंभीर कलमांतर्गत तातडीने फौजदारी गुन्हे (FIR) दाखल करावेत.
अहवाल दाबण्याचा प्रयत्न करणारे शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती प्रिया राणी पाटील व उपशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे व अधीक्षक अजय बहिर यांच्यासह संबंधित विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांना तात्काळ निलंबित करून त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (ACB) चौकशी करण्यात यावी.
शाळेची मान्यता व अनुदान तात्काळ रद्द करून ५ वी ते १० वी च्या सरल पोर्टलमधील सर्व बोगस नावे तात्काळ कमी करावीत.
येत्या ७ दिवसांत दोषींवर एफ.आय.आर. दाखल न झाल्यास मा. उच्च न्यायालय (छत्रपती संभाजीनगर खंडपीठ) येथे जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात येईल आणि शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष इंजि. सादिक इनामदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.




Leave a Reply Cancel reply