मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने बीड जिल्ह्यातील परळी मधून धनंजय मुंडे यांच्या विरोधात काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांना तर माजलगाव मधून माजी आ बाजीराव जगताप यांचे सुपुत्र मोहन जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान उमेदवारी मिळण्याच्या आशेवर पक्षात प्रवेश करणारे रमेश आडसकर यांना उमेदवारी ना मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज तिसरी यादी जाहीर केली. शरद पवार गटाकडून परळीच्या जागेबाबत सस्पेन्स होता मात्र रविवारी जाहीर झालेल्या यादीमध्ये काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान माजलगाव मधून रमेश अडसकर यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु पवार गटाने धक्कादायक निर्णय घेताना मोहन जगताप यांच्या नावाला पसंती दिली आहे.





Leave a Reply Cancel reply