बीड – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटी येथे भेट घेतली. त्यांच्यासोबत माजी आ सय्यद सलीम, जावेद कुरेशी होते.
मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा आणि उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्य पातळीवरील अनेक मंत्री, आमदार, इच्छुक उमेदवार हे भेटीसाठी जातं आहेत.
बीड विधानसभा मतदार संघांचे आमदार आणि उमेदवार संदीप क्षीरसागर हे देखील रविवारी जरांगे पाटील यांच्या भेटीला दाखल झाले. यावेळी त्यांनी आपण मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काय काय काम केले, प्रत्येक आंदोलनात कशा पद्धतीने सहकार्य केले याची माहिती दिली.
पाटील यांनी संदीप त्यांच्यासोबत चर्चा करत त्यांनी समाजाच्या आंदोलनात केलेल्या सहकार्याची दखल घेतली.





Leave a Reply Cancel reply