बीड – जगात ज्या गोष्टी अशक्य आहेत अशा गोष्टी फक्त आणि फक्त बीडमध्येच घडतात किंवा पाहायला मिळतात बीड नगर परिषदेच्या वतीने सध्या शहरात रस्ते आणि नाल्यांची कामे सुरू आहेत मात्र अवघ्या 120 मीटर रस्त्यासाठी तब्बल एक कोटी २० लाख रुपयांचा खर्च करण्यात येत आहे नगरपालिका आणि गुत्तेदार सिमेंट काँक्रीट चा रोड बनवत आहेत की सोन्याचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष बाब म्हणजे ज्या गुत्तेदाराने शहरातील 30 रस्त्यांची कामे घेतली आहेत त्याच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने अनेक कामे दुसऱ्या एजन्सीला बेकायदेशीरपणे वाटप करण्यात आली आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्यामुळे बीड शहरातील 30 रस्त्यांना 22 कोटी पेक्षा अधिक निधी मंजूर झाला. ही सर्व कामे आणि त्याचे टेंडर नगरपालिकेने प्रकाशित केल्यानंतर केवळ एकाच एजन्सीला काम द्यायचे म्हणून नगराध्यक्षांसहित सर्व पदाधिकारी मुख्याधिकारी यांनी संगणमत करून सिताई कन्स्ट्रक्शन या एजन्सीला सर्व कामाच्या वर्क ऑर्डर दिल्या.
या वर्क ऑर्डर देताना संबंधित एजन्सीकडे पुरेसे मनुष्यबळ आहे की नाही पुरेशी यंत्रणा आहे की नाही या कोणत्याच गोष्टीचा विचार केला गेला नाही सगळ्यांनी मिळून आपले आपले हित पाहून या एजन्सीला एक गठ्ठा 30 कामे दिली जे चुकीचे आणि बेकायदेशीर आहे.
एप्रिल 2026 मध्ये या सर्व कामांच्या वर्क ऑर्डर झाल्यानंतर तातडीने काम सुरू होणे अपेक्षित होते मात्र दोन-चार रस्त्यांची कामे सोडता इतर कामे अद्याप सुरू झालेली नाहीत पावसाळा सुरू असताना जी कामे सुरू केली आहेत तिचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे समोर आले आहे.
जिल्हा परिषद बीड ते बशीर्गंध हा अवघ्या 120 मीटरचा रस्ता तयार करण्यासाठी नगरपालिकेने या गुप्तदाराला तब्बल एक कोटी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे म्हणजे एका मीटरवर तब्बल लाख ते सव्वा लाख रुपये खर्च होणार की काय आणि त्यातून सिमेंट काँक्रीट ऐवजी सोन्याचा तर रस्ता तयार केला जाणार नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे.





Leave a Reply Cancel reply