मुंबई – संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फिर्यादी धनंजय देशमुख तसेच साक्षीदार दादासाहेब खेडकर या दोघांविरुद्ध अधिकाराचा अनेक वर्दीचा गैरवापर करत सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे आणि घुगे या दोघांनी गुन्हे दाखल केले त्यांच्यावर एम पी डी ए अंतर्गत कारवाई प्रस्तावित केली त्यामुळे अशा अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या मजूर अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी सभागृहात केली.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार धस यांनी बीड जिल्ह्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था तसेच पोलिसांकडून खाकी वर्दीचा केला जाणारा दुरुपयोग याबाबत गंभीर आरोप केले.
सभागृहात बोलताना आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यावर दराडे नावाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाने बीड ग्रामीण पोलिसात 307 चा गुन्हा दाखल केला. वास्तविक पाहता फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे गुन्हा घडला तेव्हा धनंजय देशमुख हे घटनास्थळी हजरच नव्हते मात्र दराडे येणे आपल्या अधिकाराचा गैरवापर करत हा गुन्हा दाखल केला.
त्याचसोबत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार असणारे दादासाहेब खेडकर या युवकावर पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनी मधुकर घुगे यांनी जाणीवपूर्वक पुन्हा दाखल करत त्याला 13 महिने जेलमध्ये ठेवण्याचे काम केले वास्तविक पाहता ज्या व्यक्तीचा या प्रकरणात जबाब घेतला तो दादासाहेब खेडकर यांचा भाऊ mp3 मधील फरार आरोपी असताना त्याला पोलीस स्टेशनला बोलवून घेत त्याचा जवाब घेतला गेला एखाद्या फरार आरोपीला बोलवून घेत घेतला गेलेला जवाब हा संबंधित पोलीस अधिकाऱ्याचा गुन्हा आहे असे म्हणत दराडे आणि घुगे यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली
बीड जिल्ह्यामध्ये काही अधिकारी जाणीवपूर्वक कोणालाही त्रास देण्याच्या उद्देशाने आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करत आहेत अशा हुजूर आणि मस्तवाल अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी सभागृहात केली.





Leave a Reply Cancel reply