News & View

ताज्या घडामोडी

Tag: #beednews

  • शेतकऱ्यांना दहा हजारांची मदत करा – जोशी !

    मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांना दहा हजार रुपये मदत देण्याची मागणी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केल्यानंतर आता भाजपचे माजी आ श्रीकांत जोशी हे देखील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी बळीराजाला साथ देण्यासाठी तातडीने याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी जोशी यांनी केली आहे. मागील काळापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे मराठवाड्यातील शेती व्यवसाय हा नुकसानीत येत असून…

  • वीज जोडणी रखडल्याने शेतकरी हैराण !

    बीड- यावर्षी पाऊस चांगला होण्याची शक्यता आहे. मान्सून दारात असताना शेतकरी मात्र वेगळ्याच चिंतेत आहे.मराठवाडा आणि विदर्भात लाखाच्या आसपास शेतकऱ्यांनी वीज जोडणी साठी अर्ज देऊन अनेक महिने उलटले तरीही महावितरण कडून जोडणीची कारवाई न झाल्याने पिकांना पाणी द्यायचे कसे या चिंतेने शेतकरी हैराण झाले आहेत. राज्यात वीज खातेदार शेतकऱ्यांची संख्या एक कोटी, ५२ लाख, ८५…

  • शेतकऱ्यांना आता जागेवर काटा पेमेंट ! बीड बाजार समितीमध्ये आ क्षीरसागर यांचा निर्णय !!

    बीड -बाजार समितीची सत्ता हातात आल्यानंतर आ संदिप क्षीरसागर यांनी प्रथमच बीट च्या वेळी हजेरी लावून शेतकऱ्यांशी संवाद साधला.या पुढे बीड बाजार समितीमध्ये दिवसातून दोनवेळा बीट होईल आणि शेतकऱ्यांना काटा पेमेंट मिळेल अशी माहिती आ क्षीरसागर यांनी दिली. शेतकरी परिवर्तन आघाडीने छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती परिवर्तनाची सुरुवात केली असून आ.संदीप क्षीरसागर यांच्या…

  • बांगर यांच्या पाठीशी परळीची ताकद- मुंडे !

    पाटोदा -सहकारात मोठी कामगिरी करणाऱ्या बांगर कुटुंबाच्या पाठीशी म्हणजेच पाटोद्याच्या पाठीशी आता परळीची ताकद असणार आहे असा शब्द माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला.पाटोदा येथे सहकार महर्षी रामकृष्ण बांगर यांच्या सतराव्या वाढदिवसानिमित्त ‘सहकार महर्षी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या अभिष्टचिंतन सोहळ्याला सिनेकलावंतांसह विविध राजकीय नेते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शनिवारी या सोहळ्याला तुफान गर्दी झाल्याचे…

  • माझ्यासाठी दिल्ली खूप दूर – धनंजय मुंडे यांनी जोडले पत्रकारांसमोर हात !

    बीड- मी राज्यातच काम करण्यास इच्छुक असून माझ्यासाठी दिल्ली अजून वीस-पंचवीस वर्ष दूर आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी लोकसभेसाठी त्यांच्या नावाची होणारी चर्चा थांबवली . जवाहर आणि वैद्यनाथ मध्ये दोघा बहीण भावांची झालेली अंडरस्टँडिंग ही नवे समीकरण उदयाला घालणार आहे का या प्रश्नावर त्यांनी पत्रकारांसमोर हात जोडत हे तुम्ही समोरच्यांना सुद्धा…

  • चार वर्षांपूर्वी ज्या दिवशी पत्नीचा एव्हरेस्ट वर मृत्यू झाला त्याच दिवशी पतीने दुसऱ्यांदा एव्हरेस्ट ला गवसणी घातली !

    बीड – जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर सर करताना चार वर्षांपूर्वी ज्या दिवशी पत्नीचे निधन या मोहीम दरम्यान झाले त्याच दिवशी म्हणजे 22 मे 2023 रोजी हे शिखर दुसऱ्यांदा सर करत बीडच्या शरद कुलकर्णी यांनी आपल्या पत्नीला अनोखी श्रद्धांजली अर्पण केली. मुळ बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेले आणि सध्या ठाण्यात स्थिरावलेले शरद दिनकर कुलकर्णी यांनी 23…

  • रेशनवर मिळणार ज्वारी अन बाजरी !

    बीड- राज्यातील सात कोटी जनतेला गहू आणि तांदळासोबत आता ज्वारी आणि बाजरी देखील रेशन मार्फत वितरित केली जाणार आहे.तृणधान्याचे आहारात जास्तीतजास्त समायोजन व्हावे याउद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या राज्यातील सात कोटी दारिद्य्ररेषेखालील शिधापत्रिकाधारकांना 2 किलो तांदूळ आणि 3 किलो गहू दिले जातात. याऐवजी किंवा याबरोबरच ज्वारी आणि बाजरी शिधापत्रिकेवर दिली जाणार आहे. काही…

  • रिटायरमेंट ला एक दिवस असणाऱ्यांना पदोन्नती देण्याचा शिक्षण विभागाचा डाव !

    शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांचे दाम करी काम धोरण शासनाला चुना लावणारे !! बीड- नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बीडचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी भलतेच मेहरबान झाल्याचे दिसत आहे.31 मे ला रिटायर होणाऱ्या काही मुख्याध्यापक आणि शिक्षकांना 30 मे रोजी पदोन्नती देण्यासाठी कुलकर्णी आणि टीम कामाला लागली आहे.यासाठी मोठी आर्थिक उलाढाल झाली असून एक दिवसानंतर रिटायर होणाऱ्यांना सुट्टीच्या…

  • सेंगोल म्हणजे काय ? नव्या सभागृहात होणार स्थापना !!

    नवी दिल्ली- भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी लॉर्ड माउंट बॅटन यांच्याकडून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी जो सेंगोल स्वीकारून शपथ घेतली आज 75वर्षानंतर पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या सभागृहात सेंगोल ची स्थापना केली जाईल आणि सभागृहाचे शानदार उद्घाटन थाटात संपन्न होईल. या सेंगोल चा इतिहास मोठा रंजक आहे. ब्रिटिशांच्या…