News & View

ताज्या घडामोडी

Tag: #beednews

  • बीड नगर परिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर !

    बीड- बीड नगर परिषदेत प्रशासकीय राज असल्याने अधिकारी मनमानी करत आहेत.बोगस कामे दाखवून शासकीय पैशाचा अपव्यय केला जात आहे.वडवणी नगर पंचायत मध्ये ज्या कामाला तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे,त्या आधारावर बीड नगर परिषद च्या कामाला प्रशासकीय मान्यता दिल्याचे उघड झाले आहे.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी बीडचे आ संदिप क्षीरसागर यांनी केली…

  • शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी अनिल जगताप !

    बीड- शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावर अनिल दादा जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीड आणि माजलगाव विधानसभा जिल्हाप्रमुख पदावर जगताप यांच्या नियुक्तीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा श्रीकांत शिंदे यांनी दिले. 9 जानेवारी रोजी अनिल जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला होता. उबाठा गटाने त्यांची जिल्हाप्रमुख पदावरून सहसंपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती…

  • उत्साह,आनंद,जल्लोषात रामागमन !

    राम ऊर्जा,राम देशाची प्रतिष्ठा- मोदी ! अयोध्या – तब्बल पाचशे वर्षाची प्रतीक्षा संपली अन प्रभू रामचंद्र यांचे आगमन स्वगृही झाले.मोठ्या दिमाखदार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष डॉ मोहन भागवत,मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदी बेन पटेल यांच्या उपस्थितीत राम लल्लाची प्रतिष्ठापना करण्यात आली.राम ऊर्जा आहे,राम देशाची प्रतिष्ठा आहे अस म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी…

  • वैद्यनाथ नगरी राममय जाहली !

    परळी- संपूर्ण देशभरात रामाच्या स्वागतासाठी रामभक्त उत्साहात सज्ज झाले आहेत.प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत म्हणजेच परळी शहरात हजारो रामभक्तांनी राम नामाचा गजर करत भव्यदिव्य शोभायात्रा काढली.पालकमंत्री धनंजय मुंडे, माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह हजारो महिला,पुरुष रामाच्या जयघोषात तल्लीन झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. कलियुगातील तब्बल साडे पाचशे वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येत मूर्त स्वरूपात विराजमान होत आहेत….

  • निलंबित शिक्षकाने केला महिलेचा विनयभंग !

    बीड -जिल्हा परिषदेने केलेल्या निलंबन कारवाई मध्ये सहभाग असल्याच्या संशयाने राग मनात धरून आपणास सहा महिन्यापासून त्रास देणाऱ्या शिक्षकांनी घराच्या पाठीमागे येऊन विनयभंग केल्याची तक्रार धारूर येथील एका महिला कर्मचाऱ्यांनी केली आहे या संदर्भात धारूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. धारूर तालुक्यातील रमेश विष्णू नखाते रा. आवरगाव ता. धारूर याने अंजनडोह केंद्राचे तत्कालीन…

  • अंधारेच्या काळात बीड शहर अस्वच्छते मध्ये टॉप टेन वर !

    83 वरून 287 वर घसरले रँकिंग ! बीड- नगर परिषदेच्या प्रशासक म्हणून कारभार हाती घेतल्यानंतर फक्त गुत्तेदारांना पोसण्याचा उद्योग करण्यात धन्यता मानणाऱ्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यामुळे स्वच्छ भारत अभियानात 83 क्रमांकावर असणारे बीड शहर 287 क्रमांकावर फेकल्या गेले आहे.याचाच दुसरा अर्थ असा आहे की बीड अस्वच्छ ते मध्ये बीड शहर टॉप टेन मध्ये आले आहे….

  • बहिणीच्या विजयाची धुरा धनंजय मुंडेंनी घेतली खांद्यावर !

    महायुतीच्या संकल्प मेळाव्यात एकजुटीचे प्रदर्शन ! बीड- नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुती मधील प्रत्येक कार्यकर्त्याने जीवाचे रान करावे,बीड लोकसभा मतदारसंघात बहिणीच्या विजयाची धुरा आपण आपल्या खांद्यावर घेतली आहे,विरोधात कोण आहे याचा अद्याप पत्ता नाही तरीही कार्यकर्त्यांनी गाफील न राहता मेहनत घ्यावी असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. बीड शहरातील आशीर्वाद लॉन्समध्ये भाजप,…

  • अंधारे मॅडम तुम्हाला जिल्हा परिषद शाळा बंद पाडायच्या आहेत का ?

    बीड- राज्य सरकारने मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी नेमलेल्या आयोगाने घरोघरी जाऊन तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या नियुक्ती करण्यात येत आहे.मात्र बीड नगर परिषद च्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी बीड तालुक्यातील अनेक शाळांमधून पाच सहा शिक्षक या कामासाठी नियुक्त केल्याने शाळा बंद राहण्याची वेळ आली आहे.मुख्याधिकारी अंधारे यांना शाळा बंद पाडायच्या आहेत…

  • मांजरसुम्बा नजीक अपघातात चार ठार !

    बीड- बीड सोलापूर हायवेवर मांजरसुम्बा नजीक असलेल्या ससेवाडी येथे पिकअप आणि कंटेनर यांचा अपघात झाला.या अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मांजरसुम्बा पाटोदा रस्त्यावर ससेवाडी या गावानजीक पिकअप आणि कंटेनर चा भीषण अपघात झाला. यामध्ये चार जण ठार झाले आहेत.अपघात एवढा भीषण होता की रस्त्यावर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघातातील मृतांची…

  • अवघ्या एक वर्षात क्रॉकरीवर दोन कोटींचा खर्च !

    शिंदे,मोमीन,ठाकूर,बोराडे यांची दरोडेखोरी ! बीड- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बीड विभागात कोट्यवधी रुपयांची बोगस बिले काढण्याचा उद्योग सुरू आहे.सोफासेट,कव्हर,टॉवेल,पडदे,क्रॉकरी साहित्य यावर एका वर्षात तब्बल तीन ते चार कोटी रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे.विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून हा सगळा खेळ अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने सुरू आहे.शासनाच्या तिजोरीवर दरोडा घालण्याचा हा प्रकार वरिष्ठ देखील डोळे उघडे ठेवून…