News & View

ताज्या घडामोडी

उत्साह,आनंद,जल्लोषात रामागमन !

राम ऊर्जा,राम देशाची प्रतिष्ठा- मोदी !

अयोध्या – तब्बल पाचशे वर्षाची प्रतीक्षा संपली अन प्रभू रामचंद्र यांचे आगमन स्वगृही झाले.मोठ्या दिमाखदार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष डॉ मोहन भागवत,मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदी बेन पटेल यांच्या उपस्थितीत राम लल्लाची प्रतिष्ठापना करण्यात आली.राम ऊर्जा आहे,राम देशाची प्रतिष्ठा आहे अस म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या.

सियावर रामचंद्र की जय’ म्हणत पंतप्रधान मोदींनी राम मंदिर संकुलातील भाषणाची सुरुवात केली. राम ही भारताची प्रतिष्ठा आणि विश्वास असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

मला प्रभू रामाचीही माफी मागायची आहे. आपल्या त्यागात आणि प्रयत्नात अशी काही कमतरता होती की आपण हे काम इतक्या शतकांपासून करू शकलो नाही. आज ती उणीव भरून निघाली आहे. मला विश्वास आहे की देव मला नक्कीच माफ करेल.

आज आमचा राम आला आहे. शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आमच्या रामाचे आगमन झाले आहे. शतकानुशतके प्रतीक्षा, त्याग, तपश्चर्या, त्यागानंतर आपला प्रभू राम आला आहे. आता आमचा रामलला मंडपात राहणार नाही, तो या दिव्य मंदिरात राहणार आहे.राम ही आग नाही तर उर्जा आहे, राम भारताची प्रतिष्ठा आहे, राम मित्रता आहे, विश्व आहे.

२२ जानेवारी २०२४ चा सूर्य एक तेजस्वी प्रकाश घेऊन आला आहे. ही कॅलेंडरवर लिहिलेली तारीख नाही, तर ती काळाच्या नवीन चक्राची उत्पत्ती आहे. आमचे रामलल्ला आता तंबूत राहणार नाही. ते आता या दिव्य मंदिरात राहणार आहेत, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर बोलताना व्यक्त केला.

माझा ठाम विश्वास आणि अपार श्रद्धा आहे की, जे काही घडले आहे, त्याची अनुभूती देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील रामभक्तांना नक्कीच होत आहे. शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आपले राम आले आहेत. शतकानुशतके अभूतपूर्व धैर्य, अगणित बलिदान, त्याग आणि तपश्चर्येनंतर आपल्या प्रभूरामांचे आगमन झाले आहे. या शुभप्रसंगी तुम्हा सर्वांना आणि तमाम देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. मी गर्भगृहात दैवी चैतन्याचा साक्षीदार बनून तुमच्यासमोर उपस्थित आहे. सांगण्यासारखे बरेच काही आहे, पण कंठ दाटून येतो, मन भरून आले आहे. आमचे रामलल्ला आता तंबूत राहणार नाही. आमचे रामलल्ला आता दिव्य मंदिरात राहणार आहेत. हा क्षण अलौकिक आहे. हा क्षण सर्वात पवित्र आहे. हे वातावरण, ह्या क्षणी आपल्या सर्वांवर प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आहे, असे पीएम मोदी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *