News & View

ताज्या घडामोडी

अंधारे मॅडम तुम्हाला जिल्हा परिषद शाळा बंद पाडायच्या आहेत का ?

बीड- राज्य सरकारने मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी नेमलेल्या आयोगाने घरोघरी जाऊन तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या नियुक्ती करण्यात येत आहे.मात्र बीड नगर परिषद च्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी बीड तालुक्यातील अनेक शाळांमधून पाच सहा शिक्षक या कामासाठी नियुक्त केल्याने शाळा बंद राहण्याची वेळ आली आहे.मुख्याधिकारी अंधारे यांना शाळा बंद पाडायच्या आहेत का असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

राज्य सरकारने नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाचे मागासलेपण तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.त्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात सर्व्हेक्षण केले जाणार आहे.मोबाईलवर एका ऍप मध्ये ही माहिती घरोघरी जाऊन भरावयाची आहे.

यासाठी बीड नगर परिषद च्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी बीड तालुक्यातील शाळांमधील शिक्षकांना आदेश काढले आहेत.मात्र या आदेशात ज्या शाळेत सहा सात शिक्षक आहेत त्यातील पाच,सहा शिक्षकांना सर्व्हेक्षण करण्याचे काम देण्यात आले आहे.

बीड तालुक्यातील कामखेडा केंद्र अंतर्गत 13 शाळा आहेत. यातील आहेर चिंचोली येथील शाळेत सात शिक्षक आहेत, त्यातील एक शिक्षिका या रजेवर आहेत,उर्वरित सहा शिक्षकांना या कामासाठी नियुक्त केले आहे.तसेच हिवरा पहाडी येथील शाळेत सहा शिक्षक,रोशनपुरा शाळेतील पाच शिक्षक या कामासाठी नियुक्त केले आहेत.

या आदेशात स्पष्टपणे दिसते यावे की एकाच शाळेतील अनेक शिक्षक नियुक्त केले आहेत,त्यामुळे या शाळांवर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण याचे उत्तर कोणीच द्यायला तयार नाही.

नगर परिषद च्या कारभारात केवळ गुत्तेदारांना पोसण्याचा उद्योग करणाऱ्या आणि बीड शहर बकाल करणाऱ्या अंधारे यांना जर जिल्हा परिषदेच्या शाळांचा अभ्यास नसेल तर त्यांनी शिक्षणाधिकारी,गट शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करून शिक्षक नियुक्त करायला पाहिजे होते.मात्र मनमानी कारभार करण्याची सवय लागलेल्या अंधारे यांच्यामुळे शाळा बंद पडण्याची वेळ आली आहे.याकडे जिल्हाधिकारी यांनी तसेच सीईओ पाठक यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

अशाच पद्धतीने अनेक शाळांमधील पाचपेक्षा जास्त शिक्षक या कामावर नेमण्यात आले आहेत.जर सगळेच शिक्षक या कामासाठी गेले तर शाळा कोणी भरवायची,विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षणाधिकारी येणार की स्वतः अंधारे येऊन शिकवणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे याबाबत ना केंद्रप्रमुख बोलायला तयार आहे ना केंद्रीय मुख्याध्यापक, मग शाळा बंद राहिल्या तर विद्यार्थ्यांनी दाद कोणाकडे मागायची हा प्रश्न अनुत्तरित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *