News & View

ताज्या घडामोडी

अवघ्या एक वर्षात क्रॉकरीवर दोन कोटींचा खर्च !

शिंदे,मोमीन,ठाकूर,बोराडे यांची दरोडेखोरी !

बीड- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बीड विभागात कोट्यवधी रुपयांची बोगस बिले काढण्याचा उद्योग सुरू आहे.सोफासेट,कव्हर,टॉवेल,पडदे,क्रॉकरी साहित्य यावर एका वर्षात तब्बल तीन ते चार कोटी रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे.विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून हा सगळा खेळ अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने सुरू आहे.शासनाच्या तिजोरीवर दरोडा घालण्याचा हा प्रकार वरिष्ठ देखील डोळे उघडे ठेवून निमूटपणे पहात आहेत.

बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता कोणीही असो,कार्यालयीन कर्मचारी,उपअभियंता, शाखा अभियंता यांच्या संगनमताने करोडो रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार सुरू आहे.एका महिन्यात किमान वीस ते चाळीस लाख रुपये हे क्रॉकरी खरेदीसाठी खर्च झाल्याचे उघड झाले आहे.

बीडच्या बांधकाम विभागात,शासकीय विश्रामगृहावर तसेच कार्यकारी अभियंता यांच्या घरी असलेल्या सोफासेट,दिवाण, पलंग,खुर्च्या यावर कव्हर बदलणे,तसेच खिडक्यांचे पडदे बदलण्यासाठी महिन्याला वीस ते तीस लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.

बीडच्या कार्यालयात आजवर नोकरी केलेले उपअभियंता एस डी शिंदे,एस एल मोमीन,एस एन ठाकूर,चंद्रकांत बोराडे यांच्या मान्यतेने हा करोडो रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यासाठी कार्यालयातील भांडरपाल,अकाउंट ऑफिसर,लिपिक यांनी देखील आपला वाटा घेऊन शासनाच्या तिजोरीवर दरोडा घालण्यासाठी मदत केली आहे.

विशेष बाब म्हणजे हा सगळा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.कपबशी,ट्रे, ताट, वाट्या,पाण्याचे ग्लास,चमचे,चहाच्या किटल्या खरेदीवर महिन्याला किमान दहा ते वीस लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *