News & View

ताज्या घडामोडी

अंधारेच्या काळात बीड शहर अस्वच्छते मध्ये टॉप टेन वर !

83 वरून 287 वर घसरले रँकिंग !

बीड- नगर परिषदेच्या प्रशासक म्हणून कारभार हाती घेतल्यानंतर फक्त गुत्तेदारांना पोसण्याचा उद्योग करण्यात धन्यता मानणाऱ्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यामुळे स्वच्छ भारत अभियानात 83 क्रमांकावर असणारे बीड शहर 287 क्रमांकावर फेकल्या गेले आहे.याचाच दुसरा अर्थ असा आहे की बीड अस्वच्छ ते मध्ये बीड शहर टॉप टेन मध्ये आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षात देशातील शहरात स्वच्छता राखण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत.दरवर्षी केंद्राचे आणि राज्याचे पथक प्रत्येक शहरात जाऊन सर्व्हेक्षण करते.शहरातील कचरा,घनकचरा व्यवस्थापन, नाल्या,रस्ते यांची साफसफाई याबाबत अहवाल सरकारला सादर केला जातो

बीड जिल्ह्यात केंद्राचे पथक जून 2023 मध्ये पाहणी करून गेले.त्यांनी दिलेल्या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. देशपातळीवर स्वच्छते बाबत 83 क्रमांक असलेले बीड थेट 287 वर घसरले आहे.तर राज्यात 43 क्रमांकावर स्थिरावले आहे.

नगर परिषद मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी शेख अफसर असो की मुन्ना गायकवाड अथवा पुरी किंवा रशीदमामु असे आपल्या जवळचे गुतेदार पोसण्या पलीकडे काहीच काम केले नाही हे यावरून दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *