News & View

ताज्या घडामोडी

Tag: #beed

  • मिलिया प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय ! सीआयडी चौकशीची मागणी –

    बीड- शहरातील अंजुमन ए इशात तालीम या संस्थेच्या शाळेत आमेर काझी नावाच्या शिक्षकाने महिला शिक्षिकांसोबत अश्लील चाळे करून त्याची चित्रफीत पॉर्न साईट ला विकली.या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही अद्याप त्याला अटक झालेली नाही,त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.या सर्व प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने पोलिसांकडे केली आहे….

  • पुरीच्या नावावर सीओ च्या भावाची गुत्तेदारी अन बहीण बोगस बिलावर सह्या करी !

    बीड- नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी आपल्या भावाच्या भल्यासाठी पुरी नावाच्या गुत्तेदाराचा वापर सुरू केला आहे.गेल्या दीड दोन महिन्यात नगर परिषदेच्या वेगवेगळ्या कामावर तब्बल दीड ते दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पुरीच्या नावावर भावाची गुत्तेदारी सुरू असताना बोगस बिलावर स्वतः मुख्याधिकारी अंधारे या बिनधास्त सह्या करत आहेत. याबाबत काही माजी…

  • माटे, आतकरे, बाहेगव्हाणकर यांची चौकशी सुरू !

    बीड- बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षण विस्तार अधिकारी असणारे वादग्रस्त सिद्धेश्वर माटे,शिवाजी आतकरे आणि निखिल बाहेगव्हाणकर यांची विभागीय चौकशी सुरू झाली आहे.त्यांच्याशी संबंधित कागदपत्रे त्यांच्या कार्यालयाकडून मागवली आहेत,त्यांना या बोगस कामात मदत करणाऱ्यांवर सुद्धा सीईओ पाठक कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षक असताना बेकायदेशीर पध्दतीने शिक्षण…

  • जेष्ठ पत्रकार सुनील क्षीरसागरांचा होणार सत्कार !

    बीड -पुरोगामी आणि कष्टकऱ्यांच्या चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते,पत्रकार असलेले ‘प्रजापत्र’ चे संपादक सुनील क्षीरसागर यांच्या कार्यकर्ता जीवनाची चाळीशी आणि वयाच्या एकसष्ठीनिमित्त त्यांचा सेवा गौरव सोहळा बीड येथे आयोजित करण्यात आला आहे.बुधवार दि.२० डिसेंबर रोजी ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालालजी सुराणा यांच्या हस्ते आणि संविधान अभ्यासक सुभाषजी वारे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन सुनील…

  • बीड जाळपोळ प्रकरणात एसआयटी – फडणवीस !

    नागपूर- बीड जिल्ह्यात 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या दगडफेक, जाळपोळ प्रकरणात येत्या दोन दिवसात एसआयटी ची स्थापना केली जाईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आ संदिप क्षीरसागर यांच्या लक्षवेधी वर ते बोलत होते. बीडचे आ संदिप क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यात 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणात लक्षवेधी उपस्थित केली होती. आ…

  • नगर पालिकेने मजूर पुरवठा करणाऱ्या गुत्तेदारावर उधळले कोट्यवधी रुपये !

    बीड- बीड नगर पालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून आंधळ दळतंय अन कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था झालेली आहे.2017 मध्ये करण्यात आलेल्या लेखा परीक्षण अहवालात अनेक त्रुटी काढण्यात आलेल्या आहेत. वेगवेगळ्या कामासाठी मजूर पुरवठा करणाऱ्या शेख अफसर नावाच्या गुत्तेदारावर कोट्यवधी रुपयांची खैरात उधळण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. बीड नगर पालिकेतील गणेश पगारे अन सलीम ट्रेसर यांच्या…

  • वादग्रस्त पगारे, सलीम पुन्हा बीड नगर पालिकेत !

    कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा ठपका असलेले आणि विभागीय चौकशी सुरू असणारे गणेश पगारे आणि सलीम ट्रेसर हे दोन कर्मचारी पुन्हा एकदा बीड नगर परिषद मध्ये रुजू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.विशेष म्हणजे त्यांना रुजू करून घेण्यासाठी मुख्याधिकारी नीता अंधारे यांचा विशेष आग्रह होता. बीड नगर परिषद मध्ये नोकरीस असताना अकाउंट विभाग असो की वसुली…

  • अखेर आमेर काझीवर गुन्हा दाखल ! न्यूज अँड व्युजच्या पाठपुराव्याला यश !!

    बीड- अंजुमन इशात ए तालीम या संस्थेच्या मिलिया शाळेत आमेर काझी या शिक्षकाने शाळेतील काही महिला शिक्षिकासोबत शाळेच्या वर्गखोली मध्ये सेक्स केल्याचे प्रकरण न्यूज अँड व्युज ने उघडकीस आणले होते.गेल्या महिनाभर पासून न्यूज अँड व्युजने हा विषय लावून धरला होता.अखेर आमच्या पाठपुराव्याला यश आले आहे.मिलिया शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या फिर्यादीवरून आमेर याच्या विरुद्ध बीड शहर पोलीस…

  • राजस्थानी मल्टिस्टेट बंद ! ठेवीदारांची गर्दी !!

    बीड- कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आणि मार्केटमध्ये एक वेगळी ओळख असलेल्या राजस्थानी मल्टीस्टेट च्या शाखा गेल्या दोन ते तीन दिवसापासून अचानक बंद झाल्याने ठेवीदारांनी शाखा समोर एकच गर्दी केली आहे मल्टीस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल बियाणे यांच्या समर्थनार्थ एकीकडे परळीत त्यांचे फॉलोवर्स रस्त्यावर उतरून त्यांना सपोर्ट करत असताना दुसरीकडे शाखा बंद झाल्याने ठेवीदार अडचणीत आले आहेत बीड जिल्ह्यात…

  • धनंजय माझ्याइतकाच देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा – अजित पवार !

    परळी- धनंजय मुंडे हा माझा सहकारी जेवढा माझ्या जवळचा आहे तेवढाच तो देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा जवळचा आहे अस म्हणत बीड जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले . परळी येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात ते बोलत होते.देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकास सुरू आहे.देशाला…