News & View

ताज्या घडामोडी

Tag: #भाजप

  • चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा,विजयकुमार गावित, सुरेश खाडे यांची गछन्ति !

    बुधवारी मंत्रिमंडळ विस्तार अन फेरबदल !! मुंबई- राज्य मंत्रिमंडळात दहा दिवसांपूर्वी अजित पवार अँड कंपनीचा समावेश झाल्यानंतर फेरबदल आणि विस्ताराची चर्चा सुरू झाली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी 12 जुलै रोजी राजभवनात विस्तार होणार आहे.यामध्ये भाजपच्या पाच प्रमुख मंत्र्यांना वगळण्यात येणार असून शिवसेनेचे देखील चार मंत्री घरी बसवण्यात येणार आहेत.भाजपकडून चंद्रकांत पाटील यांच्या सहित दिग्गजांना बदलण्यात येणार…

  • याचिका मागे,12 आमदार नियुक्तीचा मार्ग मोकळा !!

    नवी दिल्ली- दोन वर्षांपासून रखडलेल्या विधानपरिषद वरील 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.याचिककर्त्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतल्याने न्यायालयाने आमदार नियुक्ती वरील स्थगिती उठवली आहे.त्यामुळे आता कोणत्या 12 जणांना संधी मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने हटवली आहे. या 12 आमदारांची नियुक्ती प्रकरण सर्वोच्च न्यायालयात…

  • माझं ठरलंय,तुम्ही साथ देणार का -पंकजा मुंडेंचा सवाल !

    बीड- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मोठं वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.माझं ठरलं आहे,2024 मध्ये विजयी कौल घेण्यासाठी मी भूमिका घेतली आहे,पक्ष काय डिक्लेयर करायचं ते करेल अस म्हणत त्यांनी आपली पुढील वाटचाल स्पष्ट केली. 2024 मध्ये विजयी कौल मिळवण्यासाठी मी आता माझी भूमिका घेतली. पक्ष काय डिक्लेअर करेल ते…

  • देवभाऊ तुमचं चुकलंच !

    विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर देवा भाऊ तुमचं खरंच चुकलं, तुम्ही जेव्हा शाळेत होता तेव्हा म्हणजेच 70 च्या दशकात शरद पवारांनी राजकारणातलं पहिलं बंड केलं आणि पाठीत खंजीर खुपसणे हा वाक्प्रचार ऑक्सफर्ड डिक्शनरीत लिहिला गेला. आता पवारांचं बंड आणि त्यांनी वेळोवेळी स्वपक्षीयांना ब्लॅकमेल करत आपलं मांडलेलं दुकान आणि आपल्याच पक्षासोबत वेळोवेळी केलेला धोका सर्वसामान्य वाडी…

  • मोदी तामिळनाडू मधून निवडणूक लढणार !

    नवी दिल्ली- आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला भाजपने सुरवात केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी सोबतच तामिळनाडू मधील रामनाथपुरम येथूनही निवडणूक लढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. रामेश्वरम या तिर्थक्षेत्राच्या सानिध्यात दक्षिणेकडे लक्ष देण्याची भाजपची योजना असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान मोदी हे पुढील वर्षी लोकसभा निवडणूक दक्षिणेकडील राज्यातून, प्राधान्याने तामिळनाडूमधून लढवण्याचा गंभीरपणे विचार…

  • पंकजा मुंडे,विखे पाटलांच्या कारखान्याला सरकारी मदतीतून वगळले !

    बीड- राज्यातील काही ठराविक भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन मंजूर करण्यात आले आहे. मात्र राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजीमंत्री पंकजा मुंडे यांचे कारखाने यातून वगळण्यात आले आहेत, त्यामुळे भाजप अंतर्गत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षात सहकारी तत्वावरील साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक कर्जाचे…

  • कुस्तीपटूच्या आंदोलनाबाबत खा.प्रीतम मुंडेंचा हल्लाबोल !

    बीड- दिल्लीत सुरू असलेल्या कुस्तीपटुच्या आंदोलनाची दखल सरकारने घ्यायला हवी अस म्हणत बीडच्या खा प्रीतम मुंडे यांनी घरचा आहेर दिला आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत कोणीही उमेदवार समोर असला तरी आपलं काम ,लोकांशी असलेला संपर्क यामुळे आपल्याला अडचण येणार नाही अस सांगत त्यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला . बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.देशभर…

  • ऑन ड्युटी अटॅक, पोलिसाचा मृत्यू !

    बीड- कर्तव्यावर असताना पोलीस कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला अन त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. युवराज राऊत असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. पाटोदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले आणि मूळचे नाळवंडी येथील रहिवासी पोलीस कर्मचारी युवराज राऊत हे सकाळी पाटोदा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते.त्यावेळी त्यांना छातीत दुखू लागल्याने बीडला…

  • वादग्रस्त मुंडे पुन्हा बीड सिव्हिल हॉस्पिटलला !

    बीड- कोरोना काळात डॉ जयश्री बांगर,गणेश बांगर यांच्यासोबत कोट्यवधी रुपयांची बोगस खरेदी करून शासनाला चुना लावणारा स्टोर किपर अजिनाथ मुंडे हा पुन्हा बीड जिल्हा रुग्णालयात रुजू होण्यासाठी आला आहे.प्राप्त माहितीनुसार सीएस डॉ साबळे यांनी त्याच्याकडे स्टोर चा चार्ज देण्यास नकार दिला आहे.मात्र मुंडे यांनी थेट सीएम आणि आरोग्य मंत्र्यांकडे फिल्डिंग लावली आहे.रुग्णाच्या जीवाशी खेळत कोट्यवधी…

  • कर्नाटकात काँग्रेसने मैदान मारले !

    नवी दिल्ली- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने मैदान मारले आहे.दुपारी एक वाजेपर्यंत जाहीर झालेल्या निकालात काँग्रेसने 132 जागांवर आघाडी घेत 60 जागेवर विजय मिळवला आहे.तर सत्ताधारी भाजपने 64 जागांवर आघाडी घेत 21 जागेवर विजय मिळवला आहे. दरम्यान काँग्रेस ११८ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप ७३ जागांवर पुढे आहे. तसेच काँग्रेसच्या सर्व…