News & View

ताज्या घडामोडी

याचिका मागे,12 आमदार नियुक्तीचा मार्ग मोकळा !!

नवी दिल्ली- दोन वर्षांपासून रखडलेल्या विधानपरिषद वरील 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.याचिककर्त्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतल्याने न्यायालयाने आमदार नियुक्ती वरील स्थगिती उठवली आहे.त्यामुळे आता कोणत्या 12 जणांना संधी मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल.

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने हटवली आहे. या 12 आमदारांची नियुक्ती प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे अद्यापपर्यंत आमदार नियुक्ती करता आली नव्हती. दरम्यान ठाकरे सरकारने 12 आमदारांची यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांना दिली होती, पण त्यांनी त्यावर कुठलाही निर्णय राज्यपालांकडून घेण्यात आला नव्हता. तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित होतं.

त्यांनतर शिंदे फडणवीस सरकार आल्याने त्यांनी नवी यादी दिली होती. याविरोधात याचिकाकर्ते सुनील मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत ठाकरे यांनी दिलेली यादी कायम ठेवावी अशी मागणी केली होती. या प्रकरणावर आज CJI चंद्रचूड यांच्या समोर सुनावणी पार पडली.

जून 2020 पासून हा मुद्दा कोर्टात अडकलेला होता. यादरम्यान सरकार देखील बदललं त्यानंतर तरी या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा होईल असे वाटत होते. मात्र सप्टेंबर 2022 पासून कोर्टाने यावर स्थगिती आदेश ठेवला होता. त्यानंतर आज या प्रकरणातील एक याचिका मागे घेण्यास सुप्रिम कोर्टाने परवानगी दिली आहे. दरम्यान या प्रकरणात नवी याचिका दाखल केली जाऊ शकते, तोपर्यंत राज्य सरकारसाठी नियुक्तीसाठी मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *