News & View

ताज्या घडामोडी

कर्नाटकात काँग्रेसने मैदान मारले !

नवी दिल्ली- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने मैदान मारले आहे.दुपारी एक वाजेपर्यंत जाहीर झालेल्या निकालात काँग्रेसने 132 जागांवर आघाडी घेत 60 जागेवर विजय मिळवला आहे.तर सत्ताधारी भाजपने 64 जागांवर आघाडी घेत 21 जागेवर विजय मिळवला आहे.

दरम्यान काँग्रेस ११८ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप ७३ जागांवर पुढे आहे. तसेच काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना बंगळुरुमध्ये हलवण्यात येणार आहे. बहुमत न मिळाल्यास सर्व आमदारांना अज्ञातस्थळी हलवण्यात येणार आहे.कर्नाटक विधानसभेचे कल हाती येत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र दिसत आहे. असा परिस्थितीत कर्नाटकात काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी,प्रियंका गांधी यांनी कर्नाटक मध्ये जोरदार प्रचार केला होता.दुसरीकडे भाजपडकून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे प्रचारासाठी मैदानात उतरले होते.शनिवारी सकाळी निकाल येण्यास सुरुवात झाली.सुरवातीपासून आघाडीवर असलेल्या काँग्रेस ने दुपारी एक वाजेपर्यंत 60 जागेवर विजय मिळवला होता.

दरम्यान कर्नाटक मध्ये यापूर्वी तीनवेळा किंगमेकर च्या भूमिकेत असणाऱ्या जेडीएस ने यावेळी 21 जागेवर आघाडी घेतली आहे.त्यामुळे या ठिकाणी यावेळी काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करेल अशी चिन्ह आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *