News & View

ताज्या घडामोडी

Tag: #बीड जिल्हा न्यायालय

  • तृप्ती बंब ला न्यायालयीन कोठडी !

    बीड- न्यायालयाने बजावलेले अटक वॉरंट रद्द करण्यासाठी न्यायालयात हजर झालेल्या तृप्ती विजय बंब यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी वारंवार वॉरंट बजावल्या नंतर देखील सतत गैरहजर राहिल्याने न्यायालयाने ही कारवाई केली. तृप्ती विजय बंब यांनी त्यांच्या जागेत अनधिकृत बांधकाम केले होते.या प्रकरणी नगर परिषदेने नोटीस बाजवली होती.मात्र बंब यांच्याकडून बांधकाम पाडून ने घेतल्याने…

  • राज्यातील 30 शिक्षकांनाधिकाऱ्यांची विभागीय चौकशी ! शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित !!

    बीड- राज्यातील सर्वच शिक्षणाधिकारी यांची एसीबी चौकशी करण्याचा प्रस्ताव पाठवून खळबळ उडवून देणाऱ्या शिक्षण संचालक यांनी आता राज्यातील 30 शिक्षणाधिकारी यांची विभागीय चौकशी करून वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागात घबराट निर्माण झाली आहे. शिक्षक आणि कर्मचारी यांच्या भविष्य निर्वाह निधी ची रक्कम इतरत्र वापरून शासनाची फसवणूक करणाऱ्या तब्बल…

  • बीड जिल्ह्यात 1179 शबरी घरकुल मंजूर !

    बीड- ग्रामीण भागातील अनुसूचित जाती च्या कुटुंबांना शबरी आदिवासी योजने अंतर्गत घरकुल वाटपाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे.त्यानुसार बीड जिल्ह्यातील 1179 लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.यासाठी शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार राज्यातील जिल्हानिहाय ग्रामीण भागांसाठी एकूण…

  • दोनशेपेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्य अपात्र !

    बीड- ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या बीड जिल्ह्यातील तब्बल 214 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यामध्ये 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गातून निवडून आलेल्या 214 ग्रामपंचायत सदस्यांनी आतापर्यंत तहसील कार्यालयाच्या…

  • जिल्हा बँकेत लाचखोराला अटक !

    बीड-लेखा परीक्षणाच्या धनादेशाची मंजुरी घेण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या शाखा व्यवस्थापकाच्या नातेवाईकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.ही कारवाई बीडच्या जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेत घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रथमेश उर्फ बाळू ठोंबरे असे लाच घेणाऱ्या आरोपीचे नाव आहे.त्याचे काका हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत व्यवस्थापक आहेत.माजलगाव तालुक्यातील खेर्डा येथील सेवा…

  • तीक्ष्ण हत्याराने वार करत वृद्धाचा खून !

    धारूर- मुलाचे लग्न अवघ्या तीन दिवसांवर आले असताना तीक्ष्ण हत्याराने वार करत वृद्धाचा खून करण्यात आल्याची घटना धारूर तालुक्यात उघडकीस आली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथील दत्तात्रय रामा गायके वय 58 यांच्या मुलाचे तीन दिवसांनी लग्न होते.घरात लग्नाची गडबड,पाहुणे आलेले असताना बुधवारी पाहटे दत्तात्रय गायके यांच्यावर…

  • आष्टीमध्ये बालविवाह ! विजय गोल्हार यांच्याविरुद्ध गुन्हा !!

    आष्टी- एकीकडे राज्य सरकार,पोलीस हे सगळे बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती करत असताना भाजपच्या माजी जी प अध्यक्षांच्या पतीने बालविवाह लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.या प्रकरणी पोलिसात तब्बल तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आष्टी तालुक्यातील वेताळवाडीमध्ये हा बालविवाह लावण्यात आला. याप्रकरणी आता भाजप नेता विजय गोल्हार यांच्यासह नवरी व नवरदेवाचे आई- वडिल, फोटोग्राफर, आचारी, भटजी यांच्यासह…

  • पंकजा मुंडे,विखे पाटलांच्या कारखान्याला सरकारी मदतीतून वगळले !

    बीड- राज्यातील काही ठराविक भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन मंजूर करण्यात आले आहे. मात्र राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजीमंत्री पंकजा मुंडे यांचे कारखाने यातून वगळण्यात आले आहेत, त्यामुळे भाजप अंतर्गत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षात सहकारी तत्वावरील साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक कर्जाचे…

  • मान्सून लांबल्यास पाणी संकट ओढवणार !

    बीड- राज्यात यंदा मान्सून चे आगमन उशिरा होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.एकीकडे अंगाची लाही लाही करणारे प्रचंड ऊन अन दुसरीकडे लांबणारा पाऊसकाळ यामुळे जनता बेजार झाली आहे.अशात जनतेची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.राज्यातील धरणात केवळ 30 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने 15 जुननंतर पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील एकूण दोन हजार…

  • जेष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी यांचे निधन !

    मुंबई-मराठी आणि हिंदी चित्रपटात आई,बहीण,प्रेयसी,मैत्रीण अशा विविध भूमिका करून आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या आणि बॉलिवूड सह मराठी चित्रपट सृष्टीच्या दीदी अर्थात सुलोचना लाटकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. मुंबईतील दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलसा. श्वासोच्छवासाचा त्रास आणि वयोमानानुसार इतर आजारांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान, सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली….