News & View

ताज्या घडामोडी

Tag: #बीड जिल्हा न्यायालय

  • साखर उत्पादन आणि इथेनॉल निर्मितीत राज्याची भरारी !

    पुणे-साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, राज्यातील साखर कारखान्यांची वार्षिक इथेनॉल निर्मितीची क्षमता २२६ कोटी लिटरवरून २४४ कोटी लिटरपर्यंत वाढली असून पुढील वर्षाअखेरीस ती ३०० कोटी लिटरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. ‘संपलेल्या गाळप हंगामात सर्वाधिक २१० साखर कारखान्यांकडून गाळप झाले. २२ जिल्ह्यातील कारखान्यांकडून १०५२ लाख टन ऊसाचे गाळप होऊन १०५…

  • गौरवच्या टेबलवर सिव्हीलमधलं काय शिजल !

    बीड-शहरातील एसपी ऑफिस आणि जिल्हा रुग्णालयासमोर असलेल्या हॉटेल गौरव मध्ये मंगळवारी रात्री एक रंगारंग पार्टी झाली. या पार्टीत विभागीय चौकशी,डॉ साबळे यांच्यावर कुरघोडी कशी करायची असे विषय झाले.गौरव हॉटेलच्या या टेबलवर सिव्हिल मधलं नेमकं काय काय शिजल हे मात्र एक गूढच आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाचे निवासी वैद्यकीय अधिकारी, ओएस ,स्टोर किपर आणि अजिनाथ…

  • नऊ वर्षात मेडिकल पूर्ण करा नाहीतर घरी बसा !

    नवी दिल्ली- मेडिकल चे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आता कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. नऊ वर्षात पदवीचे शिक्षण पूर्ण न केल्यास त्या विद्यार्थ्याला पुन्हा परिक्षा देता येणार नाही.राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने जाहीर केलेल्या नियमात हे बदल अनिवार्य करण्यात आले आहेत. पहिल्या वर्षी पात्र होण्यासाठी त्यांना फक्त चार प्रयत्न मिळतील. नव्याने प्रसिद्ध झालेल्या पदवीधर वैद्यकीय…

  • महाविकास आघाडीचा बीडमध्ये मुकमोर्चा !

    बीड- शिवसेना नेते खा.संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी बीडमध्ये महाविकस आघाडी आज एकवटली. संतप्त महाविकास आघाडीच्या पदाधिकर्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चाचे आयोजन करून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी आपला संताप व्यक्त करत धमक्या प्रकरणी सरकारचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे…

  • महिलांच्या हातातील कोयता काढण्यासाठी प्रयत्न- जिल्हाधिकारी मुंडे !

    बीड- बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिलांच्या हाताला इथेच काम मिळावे यासाठी प्रशासन प्रयत्न करेल अशी ग्वाही देत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी या महिलांनी आपल्याकडे येऊन समस्या सांगाव्यात ,आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. वडवणी येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले यांच्या पुढाकारातून वडवणी येथे ऊसतोड कामगार महिलांचा मेळावा घेण्यात…

  • पुणे,नांदेड,छत्रपती संभाजी नगर ला फ्लॅट,हॉटेल ! रामोड ने गोळा केली करोडोची माया !!

    पुणे- भूसंपादन चा मोबदला मंजूर करण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या अतिरिक्त विभागीय आयुक्त रामोड यांचे अनेक किस्से आता समोर येत आहेत.छत्रपती संभाजी नगर,पुणे येथे फ्लॅट,हॉटेल आणि नांदेड येथे शेतजमीन अशी किमान पन्नास कोटींपेक्षा अधिकची माया जमवली असल्याचे उघड झाले आहे.पत्नीच्या नावे कंपनी स्थापन करून त्यावरही अनेक व्यवहार केल्याचे समोर आले आहे. मुळचे नांदेडचे असलेले…

  • वह्या पुस्तकांच्या किंमतीमुळे पालकांचे बजेट कोलमडले !

    बीड- शाळा सुरू व्हायला आठवडा शिल्लक असताना बाजारात वह्या पुस्तके खरेदी करण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येत आहे.मात्र यंदा 10 ते 40 टक्के किंमत वाढल्याने पालकांचे बजेट कोलमडून पडले आहे हे नक्की. जागतिक बाजारपेठेत कागदाच्या वाढलेल्या किमतीची झळ शालेय शिक्षणातील पाठ्यपुस्तके व वह्यांना बसली आहे. सध्या बाजारात दहावी-बारावीची नवी पाठ्यपुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गेल्या…

  • सुप्रिया सुळे,प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष !

    नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी खा सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड स्वतः पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य महोत्सवी मेळाव्यात पवारांनी ही घोषणा केली. शरद पवार यांनी महिनाभरापूर्वी अचानक पुस्तक प्रकाशन सोहळ्यात निवृत्तीची घोषणा केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे पवारांनी आपला निर्णय मागे घेतला.त्यानंतर पक्षात…

  • लोटस हॉस्पिटलमध्ये मोफत मधुमेह तपासणी शिबीर !

    बीड- येथील प्रथितयश लोटस हॉस्पिटलमध्ये रविवारी 11 जून रोजी मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन लोटस च्या वतीने करण्यात आले आहे. बीड शहरातील नामांकित लोटस हॉस्पिटलमध्ये दि.११ जून २०२३ वार रविवार रोजी मधुमेह निदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत चालणाऱ्या…

  • कार अपघातात दोन डॉक्टर ठार !

    अंबाजोगाई- चनई ते आडस दरम्यान कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन डॉक्टर ठार झाल्याची घटना दुपारी बारा च्या दरम्यान घडली.या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. अंबाजोगाई कडे निघालेल्या डॉ प्रमोद बुरांडे आणि डॉ रवी सातपुते यांच्या एम एच 44 एस 3983 या कारवरील ताबा सुटल्याने कार झाडावर जाऊन आदळली. यामध्ये डॉ बुरांडे हे जागीच…