News & View

ताज्या घडामोडी

लोटस हॉस्पिटलमध्ये मोफत मधुमेह तपासणी शिबीर !

बीड- येथील प्रथितयश लोटस हॉस्पिटलमध्ये रविवारी 11 जून रोजी मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन लोटस च्या वतीने करण्यात आले आहे.

बीड शहरातील नामांकित लोटस हॉस्पिटलमध्ये दि.११ जून २०२३ वार रविवार रोजी मधुमेह निदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत चालणाऱ्या शिबिरात मधुमेह तज्ज्ञ डॉ. अमित जगदिराव काळे तपासणी करणार आहेत.

जेवणा अगोदर व नंतरची रक्तातील साखर तपासणी, तीन महिन्यांची रक्तातील साखर तपासणी, डायबेटीक फूट व जखमांवर उपचार व आहार मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन लोटस हॉस्पिटल बीड च्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *