News & View

ताज्या घडामोडी

बीडच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दुकान मांडलं ! शिक्षक संघटनेकडून रेटकार्ड जाहीर !!

बीड- जिल्हा परिषदेच्या कारभारावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे समोर आले असताना आता बीडच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात देखील नंगानाच सुरू आहे.बीडचे गटशिक्षणाधिकारी टेकाळे हे पन्नास रुपयांपासून पाच हजारापर्यंत जे पदरात पडेल ते घेत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य एकल प्राथमिक शिक्षक मंच ने या अधिकाऱ्यांचे रेटकार्ड जाहीर केले आहे.

बीड जिल्हा परिषदेत सीईओ अजित पवार असोत की शिक्षणाधिकारी कुलकर्णी ,प्रत्येकजण आपापल्या पध्दतीने स्वतःच्या पदरात काय पडेल याचा विचार करत आहेत.जल जीवन मिशन असो की कर्मचाऱ्यांच्या बदल्या किंवा पदोन्नती, प्रत्येक विषयात आपल्या पदरात काही ना काही पडावे यासाठी प्रत्येक अधिकारी धडपड करताना दिसत आहे.

बीडचे गटशिक्षणाधिकारी टेकाळे कानी कार्यालयीन अधीक्षक आतकरे हे दोघे शिक्षकांना प्रत्येक गोष्टीसाठी पैशाची मागणी करतात,आणि पैसे न दिल्यास कामात त्रुटी काढल्या जातात.गटशिक्षणाधिकारी टेकाळे हे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकासाठी प्रति फाईल एक हजार रुपये तर आतकरे शंभर रुपये,वेतन निश्चितीसाठी बिईओ 2000,ओएस 200,भविष्य निर्वाह निधी बिईओ 500,ओएस 100,वेतनवाढ बिईओ 5000 ,राजमंजुरी बिईओ 200,ओएस 100,वैद्यकीय प्रतिपूर्ती वेतन मागणी बिईओ टेकाळे 500 आणि ओएस आतकरे 100 रुपये याप्रमाणे पैशाची मागणी केली जाते.

या रेट नुसार पैसे न दिल्यास हे दोघे शिक्षकांच्या कामात अडचणी निर्माण करतात,जाणीवपूर्वक त्रुटी काढून त्रास दिला जातो.हे रेटकार्ड शिक्षकांनी जाहीर केले असून याबाबत सीईओ यांच्याकडे कारवाईबाबत निवेदन देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *