News & View

ताज्या घडामोडी

महिलांच्या हातातील कोयता काढण्यासाठी प्रयत्न- जिल्हाधिकारी मुंडे !

बीड- बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिलांच्या हाताला इथेच काम मिळावे यासाठी प्रशासन प्रयत्न करेल अशी ग्वाही देत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी या महिलांनी आपल्याकडे येऊन समस्या सांगाव्यात ,आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

वडवणी येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले यांच्या पुढाकारातून वडवणी येथे ऊसतोड कामगार महिलांचा मेळावा घेण्यात आला.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी मुंडे म्हणाल्या की,बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.ऊसतोडणी साठी जाणाऱ्या महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.या महिलांच्या हाताला गावातच काम मिळावे यासाठी आपण पुढाकार घेऊ.

या कार्यक्रमास तहसीलदार संभाजी मंदे,दत्ता डाके,नायब तहसिलदार प्रकाश सिरसेवाड यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *