News & View

ताज्या घडामोडी

आष्टीमध्ये बालविवाह ! विजय गोल्हार यांच्याविरुद्ध गुन्हा !!

आष्टी- एकीकडे राज्य सरकार,पोलीस हे सगळे बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती करत असताना भाजपच्या माजी जी प अध्यक्षांच्या पतीने बालविवाह लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.या प्रकरणी पोलिसात तब्बल तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

आष्टी तालुक्यातील वेताळवाडीमध्ये हा बालविवाह लावण्यात आला. याप्रकरणी आता भाजप नेता विजय गोल्हार यांच्यासह नवरी व नवरदेवाचे आई- वडिल, फोटोग्राफर, आचारी, भटजी यांच्यासह ३२ लोकांवर ग्रामसेवक शंकर मुरलीधर म्हेत्रे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

बीड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता गोल्हार यांचे विजय गोल्हार हे पती असून पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.राज्य सरकारकडून बालविवाह प्रतिबंधासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत असताना भाजपचे पदाधिकारी जर हे असले प्रकार करत असतील तर इतरांनी काय आदर्श घ्यावा असा प्रश्न चर्चिला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *