News & View

ताज्या घडामोडी

बीड जिल्ह्यात 1179 शबरी घरकुल मंजूर !

बीड- ग्रामीण भागातील अनुसूचित जाती च्या कुटुंबांना शबरी आदिवासी योजने अंतर्गत घरकुल वाटपाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे.त्यानुसार बीड जिल्ह्यातील 1179 लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.यासाठी शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेनुसार राज्यातील जिल्हानिहाय ग्रामीण भागांसाठी एकूण १ लाख ७ हजार ९९ उद्दिष्ट/लक्ष्यांक निश्चित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये १.२० लक्ष आहे, अशा लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल. २८ मार्च २०१३ च्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमाबरोबर आदिम जमातीच्या व पारधी जमातीच्या लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ देण्यात यावा.  या योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना ५ टक्के आरक्षण ठेवण्यात आले असून, दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात यावे.

नाशिक : कळवण ३०००,नाशिक ५०००,जळगाव : यावल ५०००,नंदुरबार : तळोदा १२०००,धुळे ५७०९
अहमदनगर : राजूर २००० ,ठाणे : शहापूर २०००
पालघर : डहाणू १२७५ ,जव्हार २९४७ रायगड २६३९ रत्नागिरी ०२ ,पुणे १८६४ ,कोल्हापूर : घोडेगाव १० सातारा १० ,सोलापूर १०० ,नांदेड : किनवट ३०००
हिंगोली : कळमनुरी ५००० परभणी १०००,छत्रपती संभाजीनगर ३९३६,धाराशिव १२५,जालना १७९४,लातूर ६३६,बीड ११७९ ,अमरावती : धारणी
७९०६ ,अकोला ६०० ,बुलढाणा १५०० ,वाशिम ७०० यवतमाळ : पांढरकवडा ४०००,पुसद ५०० ,नागपूर ५००० ,वर्धा ५०० ,गोंदिया : देवरी १५०० ,भंडारा १२२६ चंद्रपूर : चंद्रपूर ७५००,चिमूर ११६६ ,गडचिरोली : गडचिरोली २०००,अहेरी ४५०,भामरागड ३२५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *