News & View

ताज्या घडामोडी

Category: बीड

  • रुग्णांकडून वसुली भोवली !एक निलंबित !

    रुग्णांकडून वसुली भोवली !एक निलंबित !

    बीड- जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून हप्ता वसुली केल्याप्रमाणे पैसे घेणाऱ्या जोहराबी शेख या कर्मचारी महिलेला निलंबित करण्यात आले आहे तर कौशल्या काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. बीड जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतले जात असल्याची बाब उघडकीस आली होती. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी चौकशी केली.चौकशी अहवालात…

  • ऊसतोड कामगाराचा मुलगा कृषिमंत्री झाला याचा आनंद- धनंजय मुंडे!

    ऊसतोड कामगाराचा मुलगा कृषिमंत्री झाला याचा आनंद- धनंजय मुंडे!

    मुंबई – माझे वडील स्व पंडित अण्णा मुंडे यांनी ऊसतोडणी च काम केलं आहे,त्यामुळे ऊसतोड कामगाराचा मुलगा कृषिमंत्री झाल्याचा आपल्याला आनंद आहे.जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या माध्यमातून लाभ देण्याचं काम आपण करू अस सांगताना नूतन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एक रुपयात पीकविमा विचार योजनांचा आढावा घेत आपला वाढदिवस साजरा केला. राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी…

  • कडा ते परळी धनंजय मुंडेंच्या स्वागतासाठी बीड जिल्ह्यात जय्यत तयारी !

    कडा ते परळी धनंजय मुंडेंच्या स्वागतासाठी बीड जिल्ह्यात जय्यत तयारी !

    बीड-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी सेना भाजप सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच ते गुरुवारी बीड जिल्ह्यात येत आहेत.त्यांच्या स्वागतासाठी कड्यापासून ते परळी पर्यंत किमान शंभर ठिकाणी मुंडेंच भव्यदिव्य स्वागत करण्याची तयारी सुरू आहे.परळीत मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परळ- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याच्या सत्तेत…

  • प्रा सुनील जोशी बिझनेस आयकॉन पूरस्काराने सन्मानित !

    प्रा सुनील जोशी बिझनेस आयकॉन पूरस्काराने सन्मानित !

    बीड – विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योजकांमुळे देश आता घेणाऱ्यांच्या नव्हे तर देणाऱ्यांच्या यादीत आला असून अशा प्रकारच्या पुरस्कार समारंभातून त्यांना अधिक जोमाने चांगले कार्य करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते असे प्रतिपादन माननीय राज्यमंत्री, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग भारत सरकार तथा खासदार डॉ सौ भारतीताई पवार यांनी महाराष्ट्र बिझनेस आयकॉन 2023 पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी…

  • पंकजा मुंडे नक्की वाचा !ब्रेक के बाद !!

    पंकजा मुंडे नक्की वाचा !ब्रेक के बाद !!

    विशेष संपादकीय/लक्ष्मीकांत रुईकर पंकजा मुंडे यांनी माध्यमांमध्ये सुरू असलेल्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेवर पूर्णविराम दिला.हे करताना त्यांनी अनेक गोष्टी उघड केल्या.त्यांना गेल्या चार वर्षात कशा पद्धतीने डावलले गेलं,कसा अन्याय झाला हे सांगितले ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकलं. पंकजा मुंडे यांचा स्वभाव बघता त्यांना सल्ला दिलेला आवडत नाही किंवा त्या कोणाच्या सल्ल्यानुसार निर्णय घेत नाहीत.2014  ते 2019…

  • कलाकेंद्र चालवणाऱ्या रत्नाकर शिंदेंची हकालपट्टी !

    कलाकेंद्र चालवणाऱ्या रत्नाकर शिंदेंची हकालपट्टी !

    बीड-अवघ्या दीड दोन महिन्यांपूर्वी जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्त झालेल्या उद्धव ठाकरे गटाचे रत्नाकर शिंदे यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे.शिंदे यांच्यावर कलाकेंद्र चालवत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या शिफारशी वरून शिंदे यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. केज शहरातील एका कला केंद्रावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा घालून काही अल्पवयीन…

  • केजमध्ये कलाकेंद्रावर पोलिसांचा छापा !

    केजमध्ये कलाकेंद्रावर पोलिसांचा छापा !

    केज- तालुक्यातील उमरी शिवारात असलेल्या एका कला केंद्रावर पोलिसांनी छापा घातला.याठिकाणी काही अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण होत असल्याचे उघड झाले आहे.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे कलाकेंद्र शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केज तालुक्यातील उमरी ग्रामस्थांनी या ठिकाणी सुरू असलेल्या कलाकेंद्राबाबत पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती.त्यानंतर सपोनि सुरेखा धस यांच्या…

  • राजकारणातून एक्झिट घेणार- पंकजा मुंडेंच्या दाव्याने खळबळ !

    राजकारणातून एक्झिट घेणार- पंकजा मुंडेंच्या दाव्याने खळबळ !

    मुंबई- मी वीस वर्षांपासून राजकारणात आहे मात्र तत्त्वाशी कधीच तडजोड केली नाही.सध्या राज्यातजे सुरू आहे किंवा अवतीभवती जे सुरू आहे ते पाहून कंटाळा आला आहे.मी दुःखी आहे,अशा पध्दतीने तडजोडी कराव्या लागल्या तर मी राजकारणातून एक्झिट घेईल असा दावा भाजपच्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी केला. पंकजा मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत काही बातम्या आल्यानंतर संतापलेल्या पंकजा यांनी…

  • गुरुची विद्या गुरूला परत,मी कच्या गुरूचा चेला नाही- धनंजय मुंडे !

    गुरुची विद्या गुरूला परत,मी कच्या गुरूचा चेला नाही- धनंजय मुंडे !

    मुंबई – आदरणीय पवार साहेब हे माझे गुरू आणि दैवत आहेत, याआधी त्यांनी सत्तापटाचा जो कार्यक्रम करून दाखवला, तसाच कार्यक्रम आम्हीही केला, शेवटी मीही कच्च्या गुरूचा चेला नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. मुंबई येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.

  • डॉ उल्हास गंडाळ बीडचे नवे जिल्हा आरोग्य अधिकारी !

    डॉ उल्हास गंडाळ बीडचे नवे जिल्हा आरोग्य अधिकारी !

    बीड- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून बीडचे रहिवासी डॉ उल्हास गंडाळ यांची नियुक्ती झाली आहे. विद्यमान डीएचओ डॉ अमोल गित्ते यांची बुलढाणा येथे बदली झाली आहे. बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी म्हणून धाराशिव / उस्मानाबाद येथे सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी असलेले डॉ गंडाळ हे मूळ बीडचे रहिवासी आहेत.अनेक वर्षांपासून शासकीय सेवेत असणारे…