News & View

ताज्या घडामोडी

रुग्णांकडून वसुली भोवली !एक निलंबित !

बीड- जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून हप्ता वसुली केल्याप्रमाणे पैसे घेणाऱ्या जोहराबी शेख या कर्मचारी महिलेला निलंबित करण्यात आले आहे तर कौशल्या काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

बीड जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतले जात असल्याची बाब उघडकीस आली होती. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी चौकशी केली.चौकशी अहवालात दोन महिला कर्मचारी दोषी आढळून आल्या.

या प्रकरणी जोहराबी शेख यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे तर काळे नामक सफाई कामगार महिलेची वडवणी येथे बदली करण्यात आली आहे. डॉ साबळे यांच्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *