News & View

ताज्या घडामोडी

प्रा सुनील जोशी बिझनेस आयकॉन पूरस्काराने सन्मानित !

बीड – विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योजकांमुळे देश आता घेणाऱ्यांच्या नव्हे तर देणाऱ्यांच्या यादीत आला असून अशा प्रकारच्या पुरस्कार समारंभातून त्यांना अधिक जोमाने चांगले कार्य करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते असे प्रतिपादन माननीय राज्यमंत्री, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग भारत सरकार तथा खासदार डॉ सौ भारतीताई पवार यांनी महाराष्ट्र बिझनेस आयकॉन 2023 पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी केले. व्यावसायिक रिसर्च क्षेत्रात कार्यरत असलेल्या रिसील तसेच इंडिया न्यूज व जय महाराष्ट्र न्यूज चॅनल यांच्या वतीने नाशिक येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री तथा उद्योजक तेजस्विनी पंडित व अभिनेत्री मुनमून दत्ता यांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध व्यवसायात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या उद्योजकांना महाराष्ट्र बिझनेस आयकॉन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुढे बोलतांना भारती ताई म्हणाल्या की कोणताही व्यवसाय म्हटलं की त्यात थोडी रिस्क असते,विविध प्रकारच्या अडचणी येत असतात परंतु या सर्वांवर मात करत देशातील व्यावसायिक खूप चांगली प्रगती करत आहेत. आज जगभरात देशाचं नाव उज्ज्वल करत आहेत. याप्रसंगी रिसील चे सीईओ मा सुधीर पठाडे, इंडिया न्यूज व जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे प्रतिनिधी, तसेच राज्यभरातून विविध क्षेत्रातील व्यावसायिक मोठया संख्येने उपस्थित होते.

बीड जिल्ह्यातून बेस्ट इन्स्टिटयूट फॉर मॅथेमॅटिक्स इन महाराष्ट्र हा पुरस्कार जोशीज मॅथस क्लासेस चे संचालक प्रा सुनिल जोशी यांना प्रदान करण्यात आला.

बीडचे नामांकित जोशीज मॅथस क्लासेस हे मागील दोन दशकांहून अधिक काळापासून बीड शहरात सर्वपरिचित आहेच ते सातत्याने विद्यार्थ्यांचे वाढते निकाल, मॅथ विषय शिकवण्याची जोशी सरांची सोपी व रंजक पद्धत यामुळे. सोबतच विद्यार्थ्यांचे सॉफ्ट स्किल डेव्हलोपमेंट, तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर, विविध वक्त्यांकडून विद्यार्थ्यांना सतत मिळणारे मोटिवेशन, क्लासेस चे नवनवीन व अभिनव उपक्रम, करिअर संदर्भात योग्य मार्गदर्शन व सहकार्य तसेच रोटरी सारख्या आंतरराष्ट्रीय संघटने सोबत विविध समाजोपयोगी उपक्रमात सहभाग या सर्वांची योग्य दखल घेत क्लासेस ला राज्यातील एक उत्कृष्ट क्लास म्हणून पुरस्कार मिळाला हे बीड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे.
त्याबद्दल त्यांचे विद्यार्थी, पालक, मित्रपरिवार व शुभचिंतक यांचेकडून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *