Category: महत्त्वाच्या
-
बीड जिल्हा परिषदेने आजोबांच्या जागेवर चक्क नातवाला दिली अनुकंपावर नोकरी !
प्रमोद काळे आणि अजित पवारांचे जाताजाता केलेले कुटाणे उघड ! बीड- शासकीय नोकरीत एखाद्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या मुलांना किंवा मुलींना अथवा पत्नीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली जाते हा नियम आहे मात्र नियमानुसार काम न करता बेकायदेशीर काम करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बीड जिल्हा परिषदेने केलेला एक कुटाणा न्यूज अँड व्ह्यूच्या हाती लागला आहे जिल्हा परिषदेचे…
-
साठ हजार कोटींच्या योजनांची घोषणा !
छत्रपती संभाजीनगर- मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल 60 हजार कोटींच्या योजनांची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. तब्बल सात वर्षानंतर छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीस 29 मंत्री उपस्थित होते. यावेळी मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी 14 हजार कोटी रुपयांची तरतूद…
-
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय !
जालना- मराठा आरक्षणाच्या विषयावरून गेल्या पंधरा दिवसापासून जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवली या ठिकाणी सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या ठरावानंतर त्यांनी आपले उपोषण तीस दिवसासाठी मागे घेत असल्याचे जाहीर केले.जर आरक्षण दिले नाही तर सरकारला धडा शिकवू असेही त्यांनी यावेळी सांगितले.उपोषण मागे घेत असलो तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जरांगे…
-
बोगस अपंग प्रकरणात चौकशी सुरू असलेले सोनवणे बीईओ पदावर बसले कसे ?
बीड- जिल्हा परिषदेच्या सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अविनाश पाठक यांनी शिस्त लावण्यास सुरवात केली आहे.मात्र बीडच्या गटशिक्षणाधिकारी पदावर नियुक्ती दिलेल्या भगवान सोनवणे यांचा इतिहास बहुदा त्यांनी तपासला नसावा.बोगस अपंग प्रमाणपत्र जोडून लाभ घेणाऱ्या सोनवणे यांना या पदावर बसवताना पाठक यांनी नेमकं काय पाहिलं अन काय केलं अशी चर्चा होत आहे. गेल्या महिनाभरापासून बीडचे गटशिक्षणाधिकारी पद…
-
माटे, आतकरे, बाहेगव्हाणकर यांना कारणे दाखवा नोटीस !
बीड- येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी सिध्देश्वर माटे, वरिष्ठ लिपिक शिवाजी आतकरे आणि कनिष्ठ लिपिक निखिल बाहेगव्हाणकर यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सीईओ अविनाश पाठक यांनी शिस्तभंगाची कारवाई का करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. लवकरच या तिघांवर निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून पदभार घेतल्यानंतर अविनाश…
-
शेतकऱ्यांना खतासाठी 100 टक्के अनुदान – कृषिमंत्री मुंडेंचा दिलासा !!
मुंबई – महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला असून या अंतर्गत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन यांसारख्या कामांना शंभर टक्के अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर आता या योजनेतून आवश्यक खतांसाठी देखील 100% अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे…
-
-
साबळे सस्पेंड पण भरती झालेल्यांवर कारवाई कधी ?
बीड- ज्या ब्लॅकलिस्ट कंपनीमार्फत लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात भरती केल्याचे प्रकरण गाजले अन त्यात डॉ सुरेश साबळे यांच्यासारख्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली त्या भरती झालेल्या कर्मचाऱ्यांवर कधी कारवाई होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात 73 कर्मचाऱ्यांची भरती केली.ही भरती करण्याची प्रक्रिया…
-
पीकविमा भरण्यासाठी शेवटचे तीन दिवस !
मुंबई – पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट द्वारे दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा…
-
बोगस बियाणे विक्री आता अजामीनपात्र गुन्हा- धनंजय मुंडे!
मुंबई – राज्यात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके यांची विक्री करणाऱ्या काही जणांवर अलीकडे कारवाई झाली आहे, मात्र बोगस बियाणे-औषधे विक्री करणाऱ्यांविरोधात अधिक कडक कायदा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून, चालू पावसाळी अधिवेशनातच बोगसगिरी करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा अधिक कडक कायदा अस्तित्वात आणला जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज मुंबई येथे पावसाळी…