News & View

ताज्या घडामोडी

लोकसभा निवडणुकीची घोषणा !

4 जूनला होणार मतमोजणी !

महाराष्ट्रात पाच टप्यात मतदान !

नवी दिल्ली- देशातील लोकसभा निवडणूक 2024 सात टप्यात होईल.पहिला टप्पा 28 मार्च पासून सुरू होईल.19 एप्रिल ला मतदान होईल.तामिळनाडू,राजस्थान,छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि बिहार.दुसरा टप्पा 28 मार्च ते 26 एप्रिल ला मतदान होईल. 12 एप्रिल ते 7 मे दरम्यान तिसरा टप्पा यात 12 राज्यात निवडणूक होईल.चौथा टप्पा 13 मे ला मतदान होईल.पाचवा टप्पा 26 एप्रिल ते 20 मे दरम्यान होईल.सातवा टप्पा 25 मे ला सुरू होईल.19 एप्रिल,26 एप्रिल,7 मे,20 मे आणि 25 मे रोजी महाराष्ट्रात मतदान होईल.

आगामी लोकसभा निवडणूक तीन वेगवेगळ्या टप्यात होणार आहे,26 विधानसभा जागेसाठी पोटनिवडणुक होणार आहे.आंध्रप्रदेश, सिक्कीम,ओरिसा आणि अरुणाचल प्रदेश या ठिकाणी विधानसभा निवडणूक होणार आहे.

16 जूनला लोकसभेचा कार्यकाळ संपत आहे,त्याचसोबत आंध्रप्रदेश सह चार राज्याचा कार्यकाळ संपत आहे.जम्मू काश्मीर मध्ये देखील निवडणूक होणार आहे.स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक होईल.

एवढे मतदार करणार मतदान…………!            97 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत. एक कोटी पन्नास लाख कर्मचारी यासाठी काम करणार आहेत.या निवडणुकीत 55 लाख ईव्हीएम चा वापर होणार आहे,देशात साडेदहा लाख मतदान केंद्रावर मतदान होईल,49.7 कोटी पुरुष आणि 47.1 कोटी महिला मतदार आहेत,18 ते 29 वयातील 28 कोटी मतदार आहेत,88 लाखापेक्षा अधिक मतदार हे दिव्यांग आहेत,82 लाख मतदार हे 85 वर्षापेक्षा अधिक आहेत,दोन लाखापेक्षा अधिक मतदार हे शंभर वर्षपेक्षा अधिक वयाचे आहेत,48 हजार मतदार हे तृतीयपंथी आहेत,अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

या सुविधा असणार………..!                      प्रत्येक बुथवर पिण्याचे पाणी,दिव्यांगासाठी रॅम्प वॉक, स्वछता गृह,मंडप असणार आहे.85 वर्षावरील मतदारांच्या घरी जाऊन मतदान करून घेण्याची तयारी केली आहे. दिव्यांग मतदारांच्या घरी सुद्धा मतदानाची सोय केली जाणार आहे.

मोफत वस्तू वाटपावर बंदी…………….….!          निवडणुकीच्या काळात मोफत साड्या वाटप व इतर वस्तू वाटपावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे,कुठेही पैसे देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रकार होणार नाही याची काळजी घेतली जाईल.

रेल्वे,विमान,हेलिकॉप्टर ची तपासणी…………….! देशात ज्या ज्या ठिकाणी विमानतळ आहेत तेथे या काळात उतरणाऱ्या विमानातील सामानाची तपासणी केली जाईल,तसेच रेल्वे आणि इतर दळणवळण च्या वाहनांची देखील तपासणी केली जाणार आहे.

सोशल मीडियावर असेल नजर……………………!निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर देखील आयोगाची नजर असणार आहे,कोणतेही समाजविघातक मेसेज,फेक मेसेज प्रसारित होणार नाहीत यासाठी सोशल मीडियावर करडी नजर असणार आहे असा इशारा आयोगाने दिला आहे.

राजकीय पक्षांना तंबी……………………………..! निवडणूक काळात राजकीय पक्षांना काही बंधन घालण्यात आली आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या स्टार प्रचारकाना नियमावली देण्यात आली आहे.कुठेही प्रक्षोभक भाषणे होणार नाहीत,झाल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी तंबी आयोगाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *