News & View

ताज्या घडामोडी

बीडचे मतदान 13 मे रोजी होणार!

नवी दिल्ली- देशभरातील लोकसभा निवडणुकीची घोषणा आयोगाने केली,ज्यामध्ये राज्यात पाच टप्यात निवडणूक होणार आहे.बीडचे मतदान  13 मे रोजी होणार आहे. 4 जूनला मतमोजणी होईल.

निवडणूक आयोग अधिकारी राजीवकुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.देशात सात टप्यात आणि राज्यात 19 एप्रिल,26 एप्रिल,7 मे,13 मे आणि 20 मे रोजी मतदान होईल.

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?

◾️पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

◾️दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

◾️तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

◾️चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

◾️पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *