Category: क्राईम
-

पोलिसच निघाला दुचाकी चोर!
बीड -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बीड पोलीस दल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ड्रीम इलेव्हणं सारख्या बेटिंग ऍप वर पैसे गमवलेल्या एका सहायक फौजदाराने चक्क दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले आहे. त्याला अटक झाली आहे. विशेष म्हणजे या पोलीस अधिकाऱ्याने यापूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालयातील बॅटऱ्या चोरल्या होत्या. आता त्याचे…
-

सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या!
बीड -पेठ बीड भागातील एका छोट्या व्यापाऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. हा सावकार राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याने पोलीस गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे. मयत व्यापाऱ्याच्या खिशात सहा पानी चिठी सापडली असून त्यात सावकारांचे नाव असल्याचे कळते. पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खाजगी…
-

फरार पवार, खाटोकर जेरबंद!
बीड – आपल्याच कोचिंग क्लासेस मध्ये शिक्षण घेणाऱ्या 17 वर्षीय मुलीच्या वर्षभरापासून शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या प्राध्यापक विजय पवार आणि प्राध्यापक प्रशांत खाटोकर या दोघांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने बीड नजीक रात्री उशिरा अटक केली. बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुल येथे शिकणार आहे का 17 वर्षे विद्यार्थिनीने प्राध्यापक विजय पवार आणि प्राध्यापक प्रशांत खाटोकर…
-

खाजगी कोचिंगच्या दोघांवर पोस्को दाखल!
बीड – शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुल येथील दोन खाजगी कोचिंग क्लास घेणाऱ्या शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. शैक्षणिक क्षेत्रात उघड झालेल्या या प्रकाराने शिक्षण क्षेत्राला काळिमा फासला गेला आहे. बीड शहरातील मध्यवस्तीत असलेल्या उमाकिरण शैक्षणिक संकुल येथे वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस चालतात. या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात…
-

पाणी पुरवठ्याचा लाचखोर कार्यकारी अभियंता जाळ्यात!
बीड – बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मुकुंद आंधळे आणि वरिष्ठ लिपिक किरण कुमार हावळे या दोघांना 80 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली या कारवाईमुळे ग्रामीण पाणी पुरवठा विभागात जलजीवन मिशनच्या माध्यमातून सुरू असलेले लाचखोरी पुन्हा एकदा उघड झाली आहे बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये मोठ्या…
-

छत्रपती च्या ठेवीदाराची शाखेसमोर आत्महत्या!
बीड -गेवराई येथील छत्रपती मल्टीस्टेट च्या शाखेसमोर सुरेश जाधव या ठेवीदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी चेअरमन संतोष भंडारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. भंडारी यांनी अनेक दिवसापासून ठेवीदारांचे पैसे देण्यास टाळाटाळ केल्याच्या तक्रारी आहेत. त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. कविता सुरेश जाधव (वय 35) यांनी म्हटले आहे की, मी व माझे पती सुरेश…
-

गाईंची तस्करी, पेठबीड मध्ये गुन्हा दाखल!
बीड – पेठबीड भागात कत्तलीसाठी गाईंची तस्करी केली जातं असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोहमदिया कॉलनी भागात छापा घातला. यावेळी 17 गाई मिळून आल्या. याप्रकरणी तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेठबीड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोहमदिया कॉलनी भागात पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी गाई बांधून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सपोनि पुजारी, पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत गुळभीले, पोकॉ…
-

महाजन वाडी येथे गोळीबारात एक ठार?
बीड तालुक्यातील महाजन वाडी येथे पवनचक्की प्रकल्पावर चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांवर सिक्युरिटी काढणे केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिकृत माहिती लवकरच हाती येईल. महाजन वाडी येथे असलेल्या पवनचक्की प्रकल्पावर काही अज्ञात लोकांनी चोरी करण्याच्या उद्देशाने हातात लाट्या-काठ्या आणि तलवारी घेऊन हल्ला चढवला…
-

बांधकाम विभागातील लाचखोर जेरबंद!
बीड -मजूर संस्थेचे नूतनिकरण करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्र 2 मधील वरिष्ठ लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले. कृष्णा मुंडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. बेलगाव येथील तक्रारदार यांच्या मजूर संस्थेचे नूतनिकरण करून अ वर्ग वर्गीकरण करण्यासाठी बीडच्या सार्वजनिक बांधकामं विभाग क्र 2 मधील वरिष्ठ लिपिक कृष्णा वसुदेव…
-

दारूच्या नशेत बापाने मुलाचा मुडदा पाडला!
माजलगाव -दारूच्या नशेत बापाने पोटच्या पोराच्या डोक्यात बांबू घालून त्याचा खून केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील खानापूर येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बीडच्या माजलगाव शहराजवळील खानापूर येथे बापाने लेकाची हत्या केली. बापाने लेकाच्या डोक्यात लाकडी बांबू घालून त्याची निर्घृण हत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. रोहित गोपाळ कांबळे असे मृत तरूणाचे नाव…



