बीड – पेठबीड भागात कत्तलीसाठी गाईंची तस्करी केली जातं असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोहमदिया कॉलनी भागात छापा घातला. यावेळी 17 गाई मिळून आल्या. याप्रकरणी तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेठबीड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोहमदिया कॉलनी भागात पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी गाई बांधून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर सपोनि पुजारी, पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत गुळभीले, पोकॉ गणेश दुधाळ, नितीश माने,अमृत पाटोळे,औदुंबर गिरी यांनी या भागात छापा घातला.

यावेळी बांधून ठेवलेल्या अवस्थेत सतरा गाई मिळून आल्या. याप्रकरणी गनी उर्फ बबलू हुसेन कुरेशी आणि इतर दोन यांच्याविरुद्ध पेठबीड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





Leave a Reply Cancel reply