News & View

ताज्या घडामोडी

2023 7image 19 33 30595164222

अर्चना कुटेंच्या पोलीस कोठडीत वाढ!

बीड -ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या अर्चना कुटे यांच्या पोलीस कोठडीत सोमवार पर्यंत वाढ करण्यात आली आहे. अंबाजोगाई न्यायालयाने या प्रकरणी आरोपीच्या सह्याचे नमुने घेण्याचे आदेश दिले आहेत.

लाखो ठेवीदारांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट तथा कुटे ग्रुपच्या प्रमुख अर्चना कुटे यांना मागील पंधरा दिवसापूर्वी सी आय डी च्या पोलिसांनी अटक केली होती. त्यांना सुरवातीला चार दिवस, त्यानंतर दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान रविवारी त्यांना अंबाजोगाई न्यायालयात हजर केले, तेव्हा सोमवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *